सातारा : सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँक लि. साताराच्या सेवक संचालकपदी अनिल मधुकर जठार यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
याप्रसंगी बँकेचे भागधारक पॅनेलचे प्रमुख व माजी चेअरमन विनोद कुलकर्णी यांच्याहस्ते, बँकेचे चेअरमन अतुल जाधव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, माजी चेअरमन व विद्यमान संचालक माधव सारडा, वजीर नदाफ, निमंत्रित संचालक अजित साळुंखे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
विनोद कुलकर्णी यांनी अनिल जठार यांचे बँकेच्या सेवेतील केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांच्या बँकेतील चांगल्या कामकाजाची दखल वेळोवेळी संचालक मंडळाने घेतली. त्यांनी शिपाई सेवक ते सिनियर ऑफिसर अशी प्रगती साधली असल्याचे विशद केले तर आज संचालक मंडळावर निवड झाल्यामुळे ते सर्वांचे अभिनंदनास पात्र असल्याचे सांगून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जनता बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजाराम ऊर्फ डॅनी पवार, माजी सेवक संचालक उमेश पाटील, उपव्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे यांनीही भाषणात अनिल जठार यांच्याबाबत गौरवोद्गार काढून ते सेवकांसाठी रोल मॉडेल ठरल्याचे नमूद करुन त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. अनिल जठार यांनी सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे यश प्राप्त झाल्याचे सांगून सर्वांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. याप्रसंगी बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |