01:39am | May 23, 2019 |
कराड : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तीन दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन श्री मळाई ग्रुप व महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने आदर्श ज्युनियर कॉलेज मलकापूर येथे करण्यात आले त्यातील तिसर्या दिवशीही तितक्याच उत्सुकतेने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी शेतकर्यांचे उद्बोधन करताना सदाशिव जगदाळे म्हणाले अवजारे खरेदी श्रमविभाजन उत्पादित मालाचे स्पर्धात्मक मार्केटिंग इत्यादी बाबी सामायिक होत असल्याने भांडवल उपलब्ध करून घेता येईल कौशल्यानुसार श्रमविभाजन करून आनंददायी पद्धतीने शेती व्यवसायात सुधारणा करता येते. व्यक्तिगत हितापेक्षा सामूहिक उत्पन्न ही वृत्ती तसेच दुसर्यांच्या विचारा विषयी आदर करणे समजून घेऊन चर्चेत सहभाग घेणे त्यामुळे आपल्या व्यवसायात सकारात्मक वाढ होईल जमीन व्यवस्थापनात खत वापराचे दुष्परिणाम जैवविविधतेचा जमीन व्यवस्थापन आत्ता लागत असलेला हातभर तसेच मिश्र पीक पद्धतीचा पुरस्कार त्याचे फायदे पोषणद्रव्ये त्याचे फायदे तोटे त्याचे प्रमाण इत्यादी बाबत शेतकर्यांना उपयुक्त अशी माहिती सोप्या पद्धतीने त्यांनी शेतकर्यांपुढे मांडली.
ड्रीम्स अँन्ड ड्रव्हर्स इंटरनॅशनल पुणेचे संचालक सुभाष रणदिवे हे पिकाची निवड कशी करावी याविषयी शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन करताना म्हणाले प्रत्येक व्यक्तीच्या अपयशात त्याच्या मनात असलेली नकार वृत्ती कारणीभूत ठरते स्वतःवर ताबा मिळवणाराच नेतृत्व करू शकतो. कृतीयुक्त ज्ञान हीच शक्ती आहे, आपले मन एका वेळी एकच विचार करू शकते. दीर्घकाळ एकाच विषयाचा विचार करतात तेच श्रेष्ठत्वास पोचतात, यशस्वी होतात. त्याप्रमाणे शेतकर्यांनी विचार करून आपल्या शेतीमध्ये समृद्धी आणावी. शेतकर्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून जबाबदारी स्वीकारून कृती करण्याची त्यातून नवनिर्मिती साधने, गट शेतीच्या माध्यमातून शेती व्यवसायात समृद्धी आणावी, असा उपदेश त्यांनी केला.
शेखर शिर्के, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे अनिकेत मोरे यांनी माननीय अशोकराव थोरात शेती मित्र यांच्या संकल्पनेतून शेतकर्यांना एकत्र आणणे त्यांचे उत्पादन त्यातील समस्या नवीन विचार इत्यादी विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शक यांचे माध्यमातून शेतकर्यांचे उद्बोधन करणे शेती व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने 3 दिवस शेतकर्यांसाठी मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल सुख शांती वाचनालयाच्या वतीने विश्वास निकम यांनी अनिकेत मोरे, अशोकराव थोरात शेती मित्र तसेच विज्ञान प्रबोधिनीचे सचिव शेखर शिर्के यांचा पुस्तक, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
एकरी 160 टन ऊस उत्पादन करणारे शेतकरी धनाजीराव निकम यांनी ऊस शेती विषयी शेतकर्यांना परिपुर्ण माहिती दिली.
अशोकराव थोरात शेती मित्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .सूत्रसंचालन प्रा.सौ.एस.डी.पाटील यांनी केले सर्व उपस्थितांचे आभार शेखर शिर्के यांनी मानले.
आर.एम.पाटील, विश्वास निकम, पी.जी.पाटील, वसंत चव्हाण, तुळशीराम शिर्के, बी.बी.पाटील, सी.डी.पवार परिसरातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |