04:03am | Aug 27, 2018 |
कराड : रेठरे बुदु्रक, ता. कराड येथे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शेकडो नागरिकांना तापासह सांधेदुखीचा त्रास सुरू आहे. अनेक रूग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रूग्णालयात धाव घेतली असून रेठरे बुद्रुकला चिकन गुनिया या साथीच्या आजाराची लागण झाली असल्याचे खाजगी रूग्णालयातून सांगण्यात येत आहे. तसा दुजोराही तालुका आरोग्य विभागाने दिल्याने सावधान... रेठरे बुद्रुकला चिकन गुनियासह अन्य साथीच्या आजारांचाही फैलाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
कराड तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून रेठरे बुद्रुककडे पाहिले जाते. या गावातील अस्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, जागोजाग साठू राहिले पाणी रस्त्यांची दुरावस्था तसेच घाणीचे साम्राज्य आदी कारणामुळे गावात साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. तर गावातील पिण्याचा पाणी पुरवठा ही दुषित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गावात भितीचे वातावरण आहे.
गावातील अनेक लोकांना ताप, चक्कर, पोटदुखी, दमा याशिवाय सांधेदुखी, मळमळ अंगदुखी, डोकेदुखी, उलटी आदी त्रास होऊ लागल्याने लोक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी गर्दी करत आहेत. यापैकी चार ते पाच लोकांच्या रक्ताचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र ते निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने नेहमीचा उपचार देऊन सोपस्कार पार पाडले. हा प्रकार गेली दोन ते तीन महिन्यापासून सुरू आहे. मात्र, या रूग्णांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात वाढच झाली आहे. रेठरे बुद्रुक व परिसरातील शेकडो रूग्ण चिकन गुनिया तसेच साथीच्या आजाराने त्रस्त झाल्याने चांगल्या उपचारासाठी खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
रेठरे बुद्रुक गावची लोकसंख्या सुमोर २० ते २५ हजारााच्या घरात आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या गावात साथीच्या आजार बळवल्यास मोठी हानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे तातडीने आरोग्य विभागाने योग्य त्या उपाय योजना करण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतीचे अपयश
रेठरे बुद्रूक गावात रस्त्यांची झालेली दुरावस्था, स्वच्छतेचा अभाव, सांडपाणी निचऱ्याची समस्या आदींवर योग्य त्या उपाय योजना करण्यात येथील ग्रामपंचयातीला सपशेल अपयश आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्य विषयक केलेल्या सूचनांचे कोठेही पालन केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ येथील नागरिकांवर आली असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चिकून गुनिया सदृष्य साथ
रेठरे बुद्रुक गावातील अनेक लोकांना ताप व सांधेदुखी सारखा त्रास होऊ लागल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रूग्णांपैकी चार ते पाच रूग्णांच्या रक्ताचे नमुने तापासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते निगेटिव्ह आले आहेत. मात्र, चिकन गुनिया सदृश्य रूग्णांत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योग्य त्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.
डॉ. सुनिल कोरबू , तालुका वैद्यकीय अधिकारी
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |