सातारा : होळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवारी रात्री जकातवाडी येथील आप्पा काटे यांच्या गंजीला लागलेल्या आगीत संपूर्ण गंज जळून अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहरापासून जवळच असलेल्या जकातवाडी येथे मंगळवारी रात्री 11.30 वाजता कुरण्याची आळी येथे आप्पा काटे यांच्या गंजीला आग लागली. आळीतील मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. प्रसंगावधान राखत त्यांनी शेजारच्या गणपत सावंत यांची पाण्याची बोरवेल सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने धग लागत होती. एका बोअरवर आग विझणे अशक्य असल्यामुळे शेजारीलच विक्रम सावंत यांची बोअरवेल सुरू केली. आजूबाजूच्या घरातून बादल्यांनी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. युवकांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मात्र आप्पा काटे यांचा सुमारे सातशे ते आठशे कडबा, 6 ते 7 गवत या आगीत भस्मसात झाले. पाऊसमान कमी, दिवसेंदिवस पाण्याची पातळी घटत चालली आहे. परिणामी चार्याची कमतरता भासू लागली आहे. आहे तो चारा जनावरांसाठी साठवून ठेवण्यात येत आहे. अनेकांनी चार्यांच्या गंजी आपल्या घराजवळ तर कोणी शेतात लावून ठेवल्या आहेत. मंगळवारी आप्पा काटे यांची घराजवळ लावलेल्या गंज पेटली. या आगीत जीवित हानी झाली नसली तरी संपूर्ण गंज जळून खाक झाली आहे. त्यामुळे आप्पा काटे यांच्यासमोर जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एवढ्या चार्यासाठी त्यांना हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकर्याला ही आर्थिक झळ परवडणारी नाही. त्यामुळे पंचनामा करून शेतकर्याला योग्य ती आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
अज्ञाताकडून आग?
दरम्यान, आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर मुले त्या दिशेने धावली त्यावेळी घटनास्थळावरून कोणी तरी पळून जाताना दिसले. परंतु अंधार असल्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकला नाही. त्यामुळे ही आग लागली का लावली, असा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला आहे. कवितांचे गाव म्हणून उदयास येणार्या जकातवाडीसारख्या गावात कोणी अशाप्रकारे आपली खुन्नस काढत असेल तर ते योग्य नाही. खुन्नस काढायची तर विकासकामात काढावी. जनावरांचा चारा जाळून कोणाचा काय फायदा होणार आहे. उलट त्या मुक्या जनावरांची उपासमार होण्यास कारणीभूत ठरणार आहे, याचा विचार विघ्नसंतोषींनी करावा.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |