12:34am | Sep 07, 2019 |
सातारा : कास परिसरासह ठिकठिकाणी चाकूचा धाक दाखवून लुटमार करणार्या फडतरवाडी ता.सातारा येथील युवकांच्या टोळीला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 1 वर्षासाठी तडीपार केले. सोमनाथ शिवाजी जाधव (वय 24), अक्षय नाथाजी गुजर (वय 24) अशी तडीपार केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित सोमनाथ जाधव व अक्षय गुजर यांच्याविरुध्द वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. संशयितांनी पर्यटन स्थळ असणारे कास, माहुली, बोरखळ येथे लुटमार्या केल्या आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करुन सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती.
संशयित दोन्ही युवकांबाबत दहशतीचे वातावरण होते. संशयितांकडून भविष्यात हिंसक घटना घडू नये यासाठी सातारा तालुका पोलिसांनी दोघांविरुध्द तडीपाराचा प्रस्ताव तयार करुन तो पोलिस अधीक्षकांकडे पाठवला. याबाबत दोघांची सुनावणी झाल्यानंतर त्यांना सातारा, जावली, कोरेगाव, कराड या तालुक्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले.
दरम्यान, आणखी काही टोळ्यांचे प्रस्ताव तयार असून त्याबाबत भविष्यात अशाचप्रकारे कारवाई होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |