06:36pm | Jul 03, 2018 |
सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी खाजगी फायनान्स कंपन्यांच्या अवैध वसुली करणार्या गुंडांनी जिल्ह्यात हैदोस घातलेला आहे. भर रस्त्यात वाहने अडवून अव्वाच्या सव्वा पैसे काढून घेवून दिवसाढवळ्या वाहनधारकांची लूट केली जात असल्यामुळे जिल्ह्यामध्ये फायनान्स कंपन्यांच्या विरोधात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणांची जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून नियमबाह्य खाजगी फायनान्स कंपन्यांची अवैध वसुली करणार्या गुंडांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सातारा टुडे शी बोलताना सांगितले.
सध्या जिल्ह्यातील खाजगी सावकारांना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आपला हिसका दाखवून त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करुन जिल्ह्यातील अवैध खाजगी सावकारांचे कंबरडे मोडले आहे. परंतू खाजगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या नावाखाली अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले अनेक गुंडपूंड जिल्ह्यात वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांचे लेबल लावून वाहनचालकांची लुटमार करीत आहेत. दि. 31 मे रोजी खाजगी फायनान्स कंपन्यांनी नियुक्त केलेल्या गुंडांच्या जाचाला कंटाळून पनवेल (नवी मुंबई) येथील तरुणाने गळफास घेवून आत्महत्त्या केली होती. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण, सातारा शहरातील वाढे फाटा येथे खाजगी फायनान्स कंपन्यांचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले गुंड गाड्यांचे थकलेले हप्ते वसूल करण्यासाठी हातात शस्त्रे घेवून उभे असतात. एखाद्या वाहनकर्जाचे हप्ते थकले असल्यास संबंधिताची गाडी अडवून त्या वाहन मालकाला बेदम मारहाण करुन त्याच्याकडून पैसे काढून घेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली असून यापुढे अशा अवैध फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटकडून कोणाची लूट झाली असल्यास त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. दोषी असणार्या खाजगी फायनान्स कंपन्यांच्या अवैध वसुली करणार्या गुंडांवर तात्काळ खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा टुडे शी बोलताना दिलेली आहे.
वसुली करण्यासाठी 'आयआयबीएफची' मान्यता हवी
खाजगी फायनान्स कंपन्यांचे हप्ते थकवलेल्या वाहनांची रिकव्हरी करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (आयआयबीएफ) ची परिक्षा देवून याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित रिकव्हरी एजंटला मिळायला हवे. तरच तो हप्ते थकलेल्या वाहनांची रिकव्हरी करण्यास पात्र असतो. मात्र जिल्ह्यात एक-दोन रिकव्हरी एजंट सोडल्यास कोणत्याही रिकव्हरी एजंटकडे अशाप्रकारचे प्रमाणपत्र नाही. आज खाजगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या नावाखाली गंभीर गुन्हे दाखल असलेले शेकडो गुंड रिकव्हरी एजंट बनून गाड्या ताब्यात घेण्याचे काम करीत आहेत. अश्यावेळी वाहन धारकाने विरोध केल्यास प्रसंगी बेदम मारहाणही केली जाते. काहीवेळा अव्वाच्या सव्वा पैसे वसुल करुन बाहेरच्या बाहेर हे वसुली एजंट कम गुंड 'तोड' करीत असतात. त्यामुळे 'आयआयबीएफची' मान्यता नसणार्या रिकव्हरी एजंटना यापुढे वसुली करता येणार नाही, असेही पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा टुडे शी बोलताना सांगितले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |