02:33am | Jan 11, 2020 |
कराड : सातारा जिल्ह्यात गतवर्षी 2019 मध्ये 14 मोक्का प्रस्तावात 150 हून अधिक लोकांच्यावर कारवाई करण्यात आली असून कराड तालुक्यातील 40 जणांवर कारवाई केली आहे. सध्या सातारा जिल्ह्यातील मोक्का कारवाईचा कोणताच प्रस्ताव नसल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, वाहतूक पोलिस निरीक्षक सतिश पवार आदी उपस्थित होते.
यावेळी वारके म्हणाले, सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर पोलिसांचे लक्ष असून युवकांच्यात प्रबोधन करणे गरजेचे आहे. कराड शहरात वाहतुकीची सर्वात मोठी समस्या असून त्यावर काम करावे लागणार आहे. शहरातील मुख्य ठिकाण असणार्या कोल्हापूर नाका येथील उड्डाण पुलावरून दुहेरी वाहतूक करण्यासाठीचा निर्णय पुढील मिटींगमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. शहरातील शाहू चौक व दत्त चौकातील वाहतूकीवर पोलिसांकडून उपाययोजना करण्यात याव्यात. त्यासाठी बॅरेगेट ट्रफिक होणार्या ठिकाणी लावावेत.
तेजस्विनी सातपुते म्हणाल्या, कराड नगरपालिका व पोलिस यांची संयुक्त मिटींग लवकरच घेवून शहरातील वाहतूकीची समस्या सोडवण्यात येईल. तसेच अतिक्रमणांवरही योग्य समन्वय साधून निर्णय घेतला जाईल. पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील गेल्यावर्षी झालेल्या मुलींच्या खूनाचा तपास योग्य दिशेने चालू असून आरोपीची नार्को चाचणी केली जात आहे. लवकरच या गुन्ह्यांचा छडा लावला जाईल.
श्री.मारूतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती जयवंतबुवा पिसाळ यांचा खून काही दिवसापूर्वी पंढरपूर येथे झाला असून याबाबत योग्य तपास चालू आहे. वारकरी संप्रादाय यांच्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे. या खुनाचा तपास व अन्य गोष्टीचा तपास हा कायद्याचा भाग म्हणूनच केला जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी दिली.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |