सातारा : ज्यांनी आमच्यासाठी छातीचा कोट केला होता असे वक्तव्य केले आहे, त्यांनी खरं तर छातीचा कोट केला होता का कोटाची छाती केली होती हा मोठा प्रश्न आहे, जर आमच्या साठी त्यांनी छातीचा कोट कधी केला असेल तर त्यांना आमचे धन्यवाद. परंतु आमच्यासाठी सातारा जिल्हावासियांनी मात्र वारंवार छातीचा कोट केला आहे हे आम्ही कृतज्ञतापूर्वक सांगतो. राजकारण-समाजकारण सोडा परंतु आमचा व्यक्तीगत वाढदिवसाचा सर्वपक्षिय कार्यक्रम असतानाही ज्यांनी कट करुन, आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट, सामान्य जिल्हावासियांनी मात्र जोरदार हाणुन पाडला होता, तमाम जिल्हावासियांनी केलेल्या छातीच्या कोटाचे त्यांना निश्चितपणे आश्चर्य वाटणारच, असा घणाघाती पलटवार सातारा लोकसभा मतदार संघातील भाजपा-सेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला.
.छातीचा कोट करणारे आपले आई-वडील असतात आणि जिवाभावाचे मित्र असतात. तसेच देशासाठी आपले शुरवीर जवान छातीचा कोट करुन, देशभुमी आणि देशवासियांचे रक्षक करीत असतात, असे नमुद करुन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, आमच्यासाठी आमच्या आईवडीलांसह जिवाभावातील सर्व सातारा जिल्हावासियांनी छातीचा कोट करुनच आजपर्यंत आम्हाला साथ दिली आहे. संबंधीत आश्चर्य व्यक्त करणारे आमदार आमचे मित्र होते व आजही असले तरी ते जिवाभावातले असते तर गतवर्षीच्या आमच्या राजकारण विरहित व्यकतीगत वाढदिवसाचे सर्वपक्षीय कार्यक्रमास ते संगनमताने दडून बसले नसते.
त्यामुळे छातीचा कोट केला म्हणणा-यांचा आता जनतेकडूनच कडेलोट होणार असल्याची कुणकुण त्यांना लागली असल्याने, त्यांनी कशाचे आश्चर्य वाटले ते त्यांनी सांगीतले परंतु संगनमताने केलेल्या कटकारस्थानांचे आश्चर्य ते सांगायला विसरले असावेत असा टोलाही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |