सातारा : भारतीय संविधान हे फुले - आंबेडकर मूल्य विचार चळवळीचे फलित आहे, त्याचे प्राणपणाने संरक्षण केले पाहिजे, असे मत बहुजन चळवळीचे अभ्यासक डॉ. अरुण शिंदे यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये आयोजित केलेल्या 'परिवर्तनाचे दीपस्तंभ' या विषयसूत्रावरील या वर्षीच्या ३३ व्या थोरांच्या स्मृती- व्याख्यानमालेत म. फुले स्मृतिदिनी डॉ.अरुण शिंदे 'म.फुले यांचा सत्यशोधक समाज' या विषयावरील पुष्प गुंफताना बोलत होते. विचार मंचावर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह अॅड. हौसेराव धुमाळ, विश्वस्त रमेश इंजे उपस्थित होते.
वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्था व भोळे कुटुंबियाच्यावतीने डॉ. भा. ल. भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कार डॉ. शिंदे यांच्या 'सत्यशोधकीय नियतकालिक' या ग्रंथासाठी जाहीर झाल्याबद्दल त्यांचा संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
डॉ. अरुण शिंदे म्हणाले, म.फुले यांची समतेची चळवळ ही ब्राम्हण जाती विरुद्ध नव्हती तर ती सर्वच समाजात असणाऱ्या मनूवादी ब्राह्मण्य प्रवृत्ती विरुद्ध होती. मानवी स्वातंत्र्य आणि हक्कांचा पुरस्कार करणारी, गुलामगिरी व शोषण मुक्तीची ही चळवळ होती. आर्य वैदिक परंपरेस पर्यायी संस्कृती देण्याचा विचार म. फुल्यांनी प्रभावीपणे मांडला. बहुजन समाजाला अस्मिता व संस्कृतीचे भान दिले. अनेकदेव व धर्म प्रामाण्यवादाची कठोर चिकित्सा करून धार्मिक संस्कृतीक दहशतवाद धर्माच्या दलालांचा मोडीत काढला. अंधश्रद्धा जोपासणाऱ्या मिथकांचे भंजन केले .
त्यांनी निर्माण केलेल्या सत्यशोधक समाजाने विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तो विचार मराठा क्रांती मोर्च्याच्या वेळी दिसला नाही अशी खंत डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. सत्यशोधक समाजाचे क्रांती बदलाचे काम थंडावले नव्हे तर मातीमोल झाले असून आता त्यांचे वारसदार पुन्हा पारंपारिकतेत अडकले आहेत. म.फुले यांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी दिलेला सत्यशोधक परंपरेचा वारसा पुनरुज्जीवीत करण्याची नितांत गरज आहे. त्यांनी सुरु केलेले अत्यंत साधेपणात होणारे सत्यशोधक पद्धतीचे विवाह आता क्वचितच होताना आढळत आहेत.
रमेश इंजे यांनी प्रास्ताविक, सूत्र संचालन कार्यवाह अॅड. हौसराव धुमाळ यांनी केले. आभार प्रा. प्रशांत साळवे यांनी मानले, कोषाध्यक्ष केशवराव कदम, विश्वस्त प्रा. सुवर्णा यादव, प्रकाश गायकवाड, जे. के. सावंत, तसेच ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ, डॉ . शिवाजी पाटील, डॉ. निळकंठ लोखंडे, डॉ. सुभाष वाघमारे, अनिल वीर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्तिथित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |