कराड : किरकोळ कारणावरून चिडून जाऊन महिलेने कुंड्या व विटा फेकून मारून हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना घटना गुरूवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास येथील मुजावर कॉलनीत घडली. यात हॉस्पिटलमधील टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह वाहनांचे नुकसान झाले असून याप्रकरणी महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उज्ज्वला दशरथ माळी (रा. मुंढे, ता. कराड), तिचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुजावर कॉलनी येथे डॉ. संजय रघुनाथ पाटील यांचे हॉस्पिटल आहे. त्यांच्या कॉलनीत उज्वला माळी या कुटुंबीयांसह राहण्यास होत्या. त्यामुळे डॉ. संजय पाटील व उज्वला माळी यांची ओळख होती. गुरुवार, दि. 6 रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास डॉ. संजय पाटील रुग्ण तपासत असताना उज्वला माळी तेथे आल्या. त्यांनी संजय पाटील यांच्या केबिनमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून एक पुस्तक व गुलाबाचे फुल डॉ. संजय पाटील यांना देऊ लागल्या. त्यावेळी डॉक्टर पाटील यांनी मला नको माझ्या पत्नीला द्या, असे सांगितले. त्यामुळे चिडून उज्वला माळी यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच हॉस्पिटल समोर असलेल्या कुंड्या उचलून केबिनवर मारून केबिनच्या काचा फोडल्या. याशिवाय टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरा तसेच हॉस्पिटल बाहेर असलेली पेशंटच्या मोटरसायकलचीही मोडतोड केली. याबाबतची फिर्याद डॉ. संजय पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी उज्वला माळी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक शिवराम खाडे तपास करत आहेत.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |