कराड : पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून सांगली जिल्ह्यातील मिरज येथील युवकाचा खून करून पळालेल्या दोघांना कराड शहर पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. ईदगाह मैदान परिसरात शुक्रवार ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयितांकडून कारसह कोयता व चाकू जप्त केला आहे.
सलीम बशीर भिलवडे (वय ३०, रा. मिरज, जि. सांगली) असे मिरज येथे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर एजाज आब्बास शेख (वय २१, रा. अमननगर, उर्दु शाळेजवळ, मिरज) व सोहेल राजू नदाफ (वय १९, रा. कृष्णा घाट रोड, लक्ष्मी मंदिराजवळ मिरज) अशी कराड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलिस हवालदार सतीश जाधव, पोलिस नाईक सचिन साळुंखे कराड शहरात शुक्रवारी सकाळी गस्त घालत होते. यावेळी ईदगाह मैदान परिसरात त्यांना मारुती कार संशयास्पदरित्या आढळून आली. त्यांनी कार अडवून कारमधील लोकांकडे विचारपूस केली. प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी गाडीची झडती घेत कारमधील व्यक्तींची अंगझडती घेतली. कारमध्ये पिशवीत ठेवलेला कोयता व एक चाकू पोलिसांना मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी संशयितांसह कार पोलिस ठाण्यात आणली.
कराड शहर पोलिस ठाण्यात संशयितांना आणल्यानंतर त्यांना त्यांचे नाव गाव विचारताच संशयितांनी एजाज शेख व सोहेल नदाफ (दोघेही रा. मिरज) असे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. गुरुवार २ जानेवारी रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी सलीम भिलवडे (रा. मिरज) याचा धारदार शस्त्राने खून केल्याचे सांगितले. त्यामुळे कराड शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलिस हवालदार सतीश जाधव, पोलिस नाईक सचिन साळुंखे यांनी ही कारवाई केली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |