12:42am | Oct 21, 2018 |
कराड : कृष्णा कारखान्याच्या वाटचालीत कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले असून, या योगदानाची दखल आमचे संचालक मंडळ सातत्याने घेत आले आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून ते लवकरच मार्गी लावले जातील, अशी ग्वाही यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा कारखान्याच्या 59 व्या बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, सुजीत मोरे, गिरीष पाटील, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, पैलवान शिवाजीराव जाधव, सौ. जयश्री पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की कारखान्याचे कामगार व अधिकारी वर्गाच्या चांगल्या समन्वयामुळे गेल्यावेळचा हंगाम यशस्वीपणे पार पडला. आम्ही कामगारांच्या हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पूर्वीच्या काळात कामगारांच्या नेमणुका योग्य पद्धतीने न झाल्याने अनेक वर्षे काम करूनही कामगारांना कायम केले गेले नाही. अनेकांना किमान वेतन व हुद्दे मिळू शकलेले नाहीत. कामगारांचे हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील असून, सर्व कंत्राटी कामगारांना नियुक्तीपत्र देवून त्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे. येत्या 2 वर्षात कामगारांना किमान वेतनाबरोबरच योग्य हुद्दे तसेच अन्य सोयीसवलती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ऊसदर आणि साखरेचे भाव याबाबत विवेचन करताना ते म्हणाले, की साखरेचे भाव वाढले तर शेतकर्यांना अधिक चांगला दर मिळू शकतो. सध्याच्या भाजप सरकारने शेतकरी हिताचे पाऊल उचलत साखरेच्या दराबाबत योग्य धोरण आखल्याने शेतकर्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साखरेचा भाव भविष्यात 3300 रूपयांपर्यत वाढल्यास शेतकर्यांना अधिक चांगला दर देणे साखर कारखानदारांना शक्य होणार आहे. यासाठी शेतकरी सभासद, साखर कारखानदार आणि शेेतकरी संघटनांनी एकजूट दाखवत शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नामदार डॉ. अतुल भोसले म्हणाले की, मला या कारखान्याचा सभासद म्हणवून घेताना अभिमान वाटतो. आप्पासाहेबांनी महाराष्ट्रात उच्चांकी दर देण्याची सभासद हिताची परंपरा कृष्णा कारखान्यात सुरू केली. त्याच पावलावर पाऊल ठेवत डॉ. सुरेशबाबा व त्यांच्या संचालक मंडळानेे अनेेक अडचणींवर मात करत गेल्यावर्षी 3220 रूपये दरासोबत मोफत 60 किलो साखर दिली. तर नुकत्याच झालेल्या हंगामासाठी उसाला 3000 रूपये दर देण्याचे धोरण घेत, मोफत साखरेसह संपूर्ण एफ.आर.पी. 2882 रूपये शेतकर्यांना अदा केली आहे. उर्वरित रक्कमही शेतकर्यांना लवकरच अदा केली जाईल.
यावेळी को-जनरेशन प्रकल्पाच्या बॉयलरचे अग्निप्रदीपनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्ही. के. मोहिते, संजय गांधी निराधार योजनेचे कराड तालुकाध्यक्ष संजय पवार, कृष्णा कामगार सोसायटीचे अध्यक्ष पैलवान आनंदराव मोहिते, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, भाजपाचे कराड तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, वसंतराव पवार, सर्जेराव पाटील, वसंतराव साळुंखे, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, बी. के. शिंदे, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष जगदीश जगताप यांनी आभार मानले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |