12:57am | Nov 24, 2018 |
सातारा : कथित डॉक्टर सिरीयल किलर संतोष पोळ याने वाई येथील सहा जणांच्या केलेल्या हत्याकांडप्रकरणी सरकार पक्षाला दणका बसला असून आता हे सर्व सहा खटले स्वतंत्रपणे चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या तीन खटल्यांची नियमित सुनावणी 26 डिसेंबरपासून सुरु होणार असून माफीचा साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, शुक्रवारी या खटल्याच्या कामकाजासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम सातार्यात आले होते.
वाई शहरासह परिसरात पाच महिला व एका पुरुषाचा कंपौंडर असलेल्या संतोष पोळ याने इंजेक्शन देवून खून केला आहे. दोन वर्षापूर्वी समोर आलेल्या या घटनेने सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली. पंधरा वर्षात संतोष पोळ याने वैद्यकीय ज्ञानाचा गैरफायदा घेवून स्वत:च्या फायद्यासाठी सहा खून करुन त्यांचे दागिने व पैसे चोरले आहेत. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने संतोष पोळ याचा पर्दाफाश केल्यानंतर वाई पोलिसांनी या घटनांचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यासाठी शासनाकडून विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाई हत्याकांडाचे दोषारोपपत्र सातारा जिल्हा न्यायालयात दाखल झाल्यानंतर या सर्व घटना वेगवेगळ्या असल्याने त्या केसेस स्वतंत्र चालवण्यात याव्यात, अशी मागणी संतोष पोळ याच्यावतीने बचाव पक्षाने केली. मात्र, खूनांची मालिका एकानेच केल्याने तसेच न्यायालयाचा वेळ अधिक वाया जावू नये यासाठी हा खटला एकत्रितच चालवावा, अशी सरकार पक्षाची मागणी होती. सरकार पक्ष हा खटला एकत्रित चालवण्यासाठी आग्रही असताना जिल्हा न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन वाई हत्याकांड खटला वेगवेगळा चालणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा न्यायालयाच्या या निकालाविरुध्द सरकार पक्ष उच्च न्यायालयात गेले असता तेथेही सरकार पक्षाची मागणी फेटाळण्यात आली. वाई हत्याकांड प्रकरणातील ही नाट्यमय घडामोड असून अशाप्रकारे सरकार पक्षाला या खटल्यात दणका बसला आहे.
शुक्रवारी वाई हत्याकांडाची सुनावणी होती. यासाठी अॅड. उज्ज्वल निकम हजर होते. त्यांनी न्यायालयात वाई हत्याकांडामध्ये मंगल जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी याबाबत जंत्री सादर केली. संतोष पोळ याने कट रचून इंजेक्शन देवून खून केले असल्याची बाजू न्यायालयात मांडली. यावर आता संशयित आरोपी बाजू मांडणार आहे. दरम्यान, या तिन्ही खटल्याची नियमित सुनावणी आता दि. 26, 27 व 28 डिसेंबर रोजी न्यायालयात होणार आहे.
दरम्यान, संतोष पोळ याची प्रेयसी ज्योती मांढरे ही तीन खटल्यांमध्ये माफीची साक्षीदार आहेे. जामीनासाठी तिने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सरकार पक्षाने तिला जामीन मिळू नये यासाठी युक्तिवाद केला असता न्यायालयाने तो ग्राह्य धरत तिचा जामीन अर्ज फेटाळला. यावेळी तपासी अधिकारी पोनि. विनायक वेताळ, सपोनि तृप्ती सोनावणे उपस्थित होते. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम न्यायालयात आल्याने वकीलांची गर्दी झाली होती.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |