कराड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, ओंड यांच्या संयुक्तविद्यमाने महिलांसाठी मोफत डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार, दि.3 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता कराड येथील टेलिफोन ऑफीस जवळ, मंदिराशेजारील यशवंतराव चव्हाण सभागृहात (बचतभवन) आयोजित केल्याची माहिती संचालिका सौ.मधुराणी थोरात व उपाध्यक्ष अमोल कांबळे यांनी दिली.
सद्याचे जग हे डिजिटल आहे आणि ते वेगाने बदलत आहे. या बदलत्या जगाचा वेग आपल्याला पकडल्याशिवाय आज पर्याय नाही. कारण डॉटनेट शिवाय आपला दिवस मावळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. व्हॉटसअप, फेसबूक, ऑनलाईन बँकिंग अर्थात ई बँकिंग, ई न्यूजपेपर, ई बूक्स अशा डिजिटल पर्यावरणात सद्या प्रत्येकाला वावरावे लागत आहे. किंबहुना काळाची ती अपरिहार्यता होऊन बसली आहे. त्यामुळे आपणाला डिजिटल साक्षर होणं महत्वाचे आहे. सोशल मिडीयावरील जगणं आज असुरक्षित आहे. आपण दररोज वर्तमानपत्रात सायबर क्राईमच्या बातम्या वाचत असतो. त्या वाचून त्याकडे सहजपणे दुर्लक्ष करतो. आपल्याबाबत तर असे होणार नाही ना, याचा गांभीर्याने आपण विचार करत नाही. तेव्हा यासाठी महिलांचे डिजिटल प्रबोधन खूप आवश्यक आहे. नेमकी हीच आवश्यकता ओळखून ज्ञानदिप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था आणि राज्य महिला आयोग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दि.3 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 यावेळेत यशवंतराव चव्हाण सभागृहात (बचतभवन), दैत्यनिवारणी मंदिराशेजारी, टेलिफोन ऑफिस जवळ, कराड येथे महिलांसाठी एकदिवसीय डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आयोगाच्या साधन व्यक्ती भक्ती भाटवाडेकर या प्रशिक्षण देणार असून ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकार्यांचे मार्गदर्शनही होणार आहे.
आजच्या डिजिटल युगामध्ये महिला सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने एक पाऊल पुढे टाकले आहे, तसेच महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसावी म्हणून महिला डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेत महिलांना कायदेविषयक माहितीही दिली जाणार आहे. या कार्यशाळेत प्रवेश विनामूल्य असून उपस्थित राहणार्या प्रशिक्षणार्थीं महिलांना राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन डिजिटल युगाशी सामना करण्यासाठी साक्षर व्हावे, असे आवाहन असे आवाहन सचिव नेताजी थोरात यांनी केले आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |