सातारा : आज सकाळी येथील गांधी मैदान येथे होणार्या प्रकाश आंबेडकर व खा. ओवेसी यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेली स्पिकरची कमान (ब्रॅकेट) कोसळल्यामुळे एक मंडप बांधणारा कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दि. २५ रोजी येथील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक तथा माजी खा. ऍड. प्रकाश आंबेडकर व एआयएमएम पक्षाचे खासदार असासुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातून हजारो लोक येणार असल्याची शक्यता गृहित धरुन गांधी मैदानावर सभा मंचकासह ठिकठिकाणी ध्वनीक्षेपक (स्पीकर) बसविण्यासाठी कमानी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी एसटी बसवरील कॅरेज स्पीकरच्या वायरमध्ये अडकल्यामुळे उभी करण्यात आलेली ध्वनीक्षेपकाची कमान जागेवरच कोसळली. या अपघातात मंडप बांधणारा कामगार गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान याठिकाणावरुन शाळेसाठी अनेक विद्यार्थी त्याचवेळेस जात होते. मात्र सुदैवाने या अपघातात कोणताही शाळकरी विद्यार्थी जखमी झाला नसल्याने पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झालेली आहे.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |