सातारा : फलटणसह जिल्ह्यात ठिकठिकाणी अक्षरश: धुमाकूळ घातलेल्या सराईत गुन्हेगार महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे व त्याच्या दोन साथीदारांवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी संघटीत गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कारवाई केली. या टोळीवर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, जानेवारी महिन्यात या टोळीने फलटण येथे दोन महिलांसह एकाला मारहाण करुन 50 हजार रुपयांचा जबरदस्तीने चोरुन नेला होता.
दि. 28 जानेवारी 2018 रोजी याप्रकरणातील तक्रारदार दोन चुलत बहिणींसह भाच्याचा फलटण येथील नारळीच्या बागेजवळ शोध घेत होते. याचवेळी संशयित तिघेजण त्याठिकाणी दुचाकीवरुन आले. संशयितांमध्ये माक्या शिरतोडे व त्याचे दोन साथीदार होते. संशयितांनी दुचाकी तिघांसमोर आडवी मारुन दमदाटी करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे तक्रारदारसह दोन्ही महिला घाबरल्या. संशयितांनी याचा गैरफायदा घेवून जबरदस्तीने तिघांकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम मोबाईल असा 47 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला.
या घटनेनंतर तक्रारदार यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर तपासामध्ये कुख्यात गुन्हेगार माक्या शिरतोडेसह त्याच्या टोळी हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. माक्या शिरतोडेची टोळी रस्त्यावरुन येणार्या-जाणार्यांची लुटमार करण्यात सराईत आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्याचा उलगडा झाला. दरम्यान, संशयित टोळीवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, गर्दी, मारामारी असे अनेक गुन्हे केले आहेत. या टोळीवर जिल्ह्यातील फलटण शहर, वाई, बारामती, वाठार, पुसेगाव, सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
फलटण पोलिस जानेवारी महिन्यातील जबरी चोरीचा तपास करत असताना या टोळीविरुध्द भक्कम पुरावे मिळाले. यामुळे या टोळीविरुध्द फलटणचे पोनि एस.व्ही.हंकारे यांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला. हा प्रस्ताव पुढे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला असताना त्यांनी त्याला मंजुरी दिली आहे.
आता या मोक्काचा तपास पोलिस उपअधीक्षक डॉ.अभिजीत पाटील हे करणार आहेत. या टोळीच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती घेवून संघटीत टोळीविरुध्द प्रभावी कारवाई केली जाणार आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |