04:51pm | Nov 30, 2018 |
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा आपल्या अचूकतेमुळे नेहमीच ‘धर्मकाटा’ म्हणून ओळखला जातो. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार यावर्षीही शासकीय भरारी पथकाने नुकतीच कारखान्याच्या वजनकाट्याची पाहणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कृष्णाच्या वजनकाट्याने ‘धर्मकाटा’ ही ओळख अबाधित राखली आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची पाहणी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी काढले आहेत. यानुसार नायब तहसीलदार अजित कुर्हाडे, वैद्यमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक ल. उ. कुटे, पुरवठा निरीक्षक गोपाळ वसु, शेणोलीचे मंडल अधिकारी राठोड, बळीराजा शेतकरी संघटनेचे साजिद मुल्ला, शेतकरी संघटनेचे विश्वास जाधव, रयत क्रांती संघटना वाळव्याचे गणेश शेवाळे, अशोक लोहार यांनी संयुक्तपणे कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रमाणित वजनाने तपासणी करण्यात आली. तसेच ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृष्णा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला आहे. यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ई.डी.पी. मॅनेजर अवधूत रेणावीकर, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, ए. डी. पाटील, स्टोअर किपर जी. बी. मोहिते आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |