कराड : युवा विकास प्रतिष्ठान कराड व भाजपा युवा मोर्चा तर्फे असंघटीत कामगार मेळाव्याचे आयोजन बाबुभाई पद्मसी शहा हॉल विठ्ठल चौक कराड येथे नुकतेच करण्यात आले. सदर मेळाव्यास मोहन जाधव संचालक पुणे म्हाडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. युवा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विष्णूकाका पाटसकर व धनाजी जाधव व सुदर्शन पाटसकर भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव इ. ची उपस्थिती होती.
सदर मेळाव्याचा उद्देश विषद करताना सुदर्शन पाटसकर म्हणाले की, तळागाळातील कष्टकरी कामगारांच्या हाताला बळ देवून आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी, आम्ही असंघटीत कामगारांपर्यत पोहचून, त्यांना शासनाच्या विविध योजना समजावून संागुन त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत असे सांगितले. या माध्यमातून आम्ही कराड तालुक्यामधील एकूण 750 कुटूंबापेक्षा जास्त कामगारांची नोंदणी केलेली आहे. त्यातील कामगारांना अवजारे, खरेदी करण्याकरिता र.रू 5000/- चे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. त्याच बरोबर सुरक्षा संच व अत्यावश्यक संच हे सुमारे 10,000/- रूपये किंमतीचे साहित्य कामगारांना मिळवून दिले आहे. या कामगारांना आवश्यक सर्व योजना मिळवून देणेकामी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे उपस्थित कामगारांना आश्वासन दिले.
मेळाव्याचेे प्रमुख अतिथी मोहन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुदर्शन पाटसकर यांनी असंघटीत कामगांरा प्रति केलेल्या कार्याचा गौरव केला. शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ कामगारांनी घेतला पाहिजे त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे असे सांगितले.
या मेळाव्यामध्ये प्रथमःत नोंदणी पुस्तकाचे वाटप करण्यात आले, तद्नंतर ज्या कामगारांच्या खात्यात अनुदान म्हणून 5000/- रूपये जमा झालेले आहेत अशा कामगारांना चेकचे व नोंदणीधारक उपस्थित कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने कामगार बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमर फारूख सय्यद, मोहन पुरोहित यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर शिंदे, कुलदिप जाधव, सुरज जिरगे, अभिजित म्हात्रे, योगेश पवार, राजु पवार, हरिष पाटील, युवराज साखरे, सुदाम साळुंखे, सुरेश दौडमनी, महेश पुजारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |