महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील बिरवाडी गावाच्या हद्द्ीतील वन विभागात जाळी बंधारा कामावर असलेल्या राजु गुलाब चव्हाण वय 45 रा. शिरस ता. शिरूर जि. पुणे याने आपला सहकारी प्रदीप भांबु कदम वय 35 रा. गोळेगणी ता. पोलादपुर जि. रायगड याचा डोक्यात अज्ञात वस्तुने प्रहार करून त्याचा खुन केला होता. त्यानंतर पळून जाणार्या आरोपी राजू चव्हाण याच्या अवघ्या सहा तासातच महाबळेश्वर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
वन विभागात ठिक ठिकाणी जाळी बंधारे बांधण्याचे काम महेश मोहन चव्हाण या ठेकेदाराने घेतले होते. गेली दोन महीन्या पासून या बंधारे बांधण्याचे काम चालु आहे. बंधारा बांधण्यासाठी राजु चव्हाण त्याची पत्नी रेणुका चव्हाण व प्रदीप कदम हे तिघे काम करीत होते. कामाच्या ठिकाणा पासून बिरवाडी हे गाव जवळ असल्याने हे तिघेही बिरवाडी गावातील समाज मंदीरात राहत होते. रविवार दि. 17 मार्च रोजी राजू चव्हाण व प्रदीप कदम हे दोघे महाबळेश्वर येथे मोटार सायकल वरून काही कामानिमित्त आले होते. काम झालेनंतर दोघांनी येथील देशीदारू गुत्त्यात बसुन भरपुर दारू प्राशन केली. व सायंकाळी बिरवाडी गावाकडे निघाले बिरवाडी गाव 1 कि.मी. अंतरावर असताना दोघात किरकोळ कारणा वरून बाचाबाची झाली. या भांडणाच्या रागातुन राजु चव्हाण याने प्रदीप कदम याला मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारामारी मध्ये हाताला लागलेल्या एका अज्ञात वस्तुने राजु चव्हाण याने प्रदीप कदम याच्या डोक्यावर प्रहार केला व तो पळून गेला.
पहाटे दोन कामगारांच्या भांडणाची व भांडणात एक कामगार बेपत्ता झाल्याची खबर महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांना मिळाली. त्यांनी फौजदार बालाजी गायकवाड व पोलीस कर्मचारी यांचे एक पथक बेपत्ता कामगाराच्या शोधासाठी बिरवाडी येथे पाठवुन दिले. हे पथक सकाळी आठ वाजता गावात पोहचले. या पोलिस पथकाने गावात चौकशी करून बेपत्ता कामगाराचा शोध सुरू केला. दरम्यान मारहाण करून बेपत्ता झालेल्या राजु चव्हाण यांचा मोबाईल क्रमांक मिळवुन त्याचे बरोबर संपर्क साधला परंतु तो सध्या कोठे आहे. याची माहीती देत नव्हता त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान प्रदीप कदम याचा पत्ता लागत नसल्याने त्याचा खुन झाला आहे याची कोणालाच माहीती नव्हती. सकाळी साडे 9 वाजता बिरवाडी गावापासुन 1 कि.मी. अंतरावर पाय वाटेवर एका ठिकाणी प्रदीप कदम याच्या चप्पला आढळुन आल्या. सर्व पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी याठिकाणी पुन्हा शोध सुरू केला तेव्हा तेथुन गवता वरून ओढत घेवुन गेल्याच्या खुना आढळुन आल्या. त्या दिशेने शोध घेतला असता बांधाच्या खाली चार ते पाच फुट खोल खड्ड्या प्रदीप कदम याचे शव आढळुन आले जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग व परीसराची माहीती घेतली व प्रेताचा पंचनामा करून शव विच्छेदनासाठी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीचा सुगावा लागल्यानंतर आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले. वाई येथुन आरोपीस महाबळेश्वर येथे आणण्यात आले आरोपी राजु चव्हाण याचेवर भादवी 302 नुसार खुनाचा गुन्हानोद करण्यात आला आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |