सातारा : सातारा तालुक्यातील मर्ढे प्राथमिक शाळेला शिक्षण सभापती राजेश पवार यांनी काल दुपारी भेट देवून सातारा जिल्हा परिषदेच्या शाळेच्या कामकाजाबाबत उपयुक्त सूचना करुन त्वरित याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. तसेच शाळा व व्यवस्थापन समितीच्या कामकाजाबाबत कौतुक केले. यावेळी सातारा टुडे चे संपादक संग्राम निकाळजे, अजित जगताप, विठ्ठल हेंद्रे, पराग शेणोलीकर, विशाल कदम व मर्ढे सरपंच शरद शिंगटे, प्रवीण शिंगटे उपस्थित होते.
कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे या गावात काल अचानक सभापती राजेश पवार यांनी प्राथमिक शाळेची अस्थेवाईकपणाने पाहणी केली. शाळेमध्ये असणारे स्वच्छतागृह, वर्गखोल्या व शिक्षकांच्या अध्यापनाबाबत स्वत: पाहणी केली. यावेळी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी व कचरा टाकण्यासाठी सुविधा नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच विहीर मुजवून बांधण्यात आलेल्या शाळा खोलीची जमीन खचल्याने त्याच्या दुरुस्तीबाबत निधी देण्याचेही त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
मर्ढे गावामध्ये तीन खाजगी प्राथमिक शाळा असतानाही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांना या शाळेत दाखल केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. शाळेची गुणवत्ता चांगली असून शाळा व्यवस्थापन समितीचे पूर्ण सहकार्य असल्याची त्यांनी शेरेबुकमध्ये नोंद केली. यावेळी मुख्याध्यापक संजय पवार, शाळा समितीचे महेंद्र पवार, प्रल्हाद शिंगटे, शिवाजीराव शिंगटे, उप शिक्षक वनिता माने, बाळू बरकडे, शरद गुरव, मोहिनी घाडगे यांचे अध्यापनाचे कार्य व्यवस्थित होत असल्याचे पाहिले. शिक्षण सभापती यांचे शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीने स्वागत केले. या शाळेच्या मागणीनुसार लवकरच पाठपुरावा करुन निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन सभापती पवार यांनी दिले. या शाळेच्या आवारात रस्त्याची उंची वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. त्याबाबतही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |