11:51pm | Jul 26, 2018 |
सातारा : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी काल निघालेल्या ठोक मोर्चानंतर उडालेल्या भडक्यात तुफान दगडफेक करत महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी दंगल घडवणे, खूनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यासाठीची कलमे लावून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून धरपकड सुरू असून कालच्या धुमश्चक्रीतून सावरलेले पोलीस आता त्या कामाला लागले आहेत.
निखिलेश मस्के, सुरज निगडे, उदयजित कांबळे, सचिन माने, संभाजी गंभीर, किरण जाधव (सर्व रा. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे असून, यांच्यासह अल्पवयीन युवकांचाही समावेश आहे. बुधवारी रात्रीपासून दंगलीत समावेश असणाऱ्यांची नावे समोर येत असून त्यामध्ये मंगेश जगताप, संजय पवार, मंगेश ढाणे, मल्लेश मुलगे, सचिन कोळपे, सचिन खोपडे, महेश माने, जीवन राउते, निकेत पाटणकर, संदीप नवघणे, सचिन कदम, समीर शेख, लक्ष्मण खरडे (सर्व रा. सातारा शहर परिसर व तालुका) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्यांची नावे आणखी वाढणार असून त्यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी फौजदार नानासाहेब कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बुधवारी सकल मराठा समाजाचा हजारो बांधवांच्या उपस्थितीत मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन शांततेत पार पडले. दुपारी बारानंतर मात्र, अचानक महामार्ग रोखण्यावरुन हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाचे हे लोण एवढे आक्रमक बनले की अचानक विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील सर्व भाग, नटराज मंदिर परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत सातारा जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह तब्बल ३२ कर्मचारी जखमी झाले आहेत. दुपारी तीन नंतर अखेर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या जमावाला काबू करण्यास सुरुवात करुन धरपकड मोहीम राबविली.
रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी सुमारे ७० जणांना ताब्यात घेतले होते. संबंधितांची चौकशी केली असता गुरुवारी सकाळपर्यंत १० जणांचा दंगलीत प्रत्यक्ष सहभाग आढळला. याशिवाय पोलिसांनी केलेले शुटींग, फोटो याची खातरजमा केली असता त्यातून आणखी अनेकांची नावे समोर आली असल्याचे पोलिसांचे तक्रारीत म्हणणे आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |