03:15am | Feb 13, 2019 |
कराड : कार्वे (ता. कराड) येथे काल (रविवारी) मुंबई येथील एम्पथी फाऊंडेशन व माजी सरपंच वैभव निवासराव थोरात मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी नऊ ते दुपारी सुमारे चार वाजेपर्यंत शिबीर पार पडले. शिबीरास कार्वे परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 5 ते वयोवृध्द गटामधील अबालवृध्दांची मोठी गर्दी झाली होती. शिबीरामध्ये 1 हजार 671 शिबीरार्थींनी सहभाग नोंदवला. यावेळी 1 हाजर 671 शिबीरार्थींची डोळे तपासणी करण्यात आली.
त्यामधील 1288 जणांना जागेवर चष्म्यांचे वाटप झाले. 245 जणांचे भिन्न चष्मे असल्याने त्यांना काही मोजक्या कालावधीत चष्मे दिले जाणार आहेत. शिबीरार्थींमधील 200 जणांवर शस्त्रक्रिया होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शिबीरास सदिच्छा भेट दिली. व शिबीराचा आढाव घेतला.
यावेळी आ. आनंदराव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, एम्पथीचे प्रोजेक्ट मॅनेंजर दिनेश झोरे, समन्वयक संदिप दबडे, सांगली जिल्हा पुरवठा विभाग दक्षता समितीच्या सदस्या शबाना मुजावर, कराड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, आबा सुर्यवंशी, प्रकाश पाटील-शेणोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी सरपंच भिमराव खडके, वैभव थोरात, उपसरपंच संभाजीराव थोरात, माणिकराव थोरात, आनंदराव थोरात, भागिर्थी थोरात यांनी स्वागत केले. नागेश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. व आभार मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी वैभव थोरात मित्रपरिवारातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |