नवी दिल्ली : आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
‘जिओ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार कंपनीच्या ग्राहकांना अन्य ऑपरेटर्सच्या नेटवर्कवर करण्यात येणाऱ्या कॉलसाठी काही रक्कम देणे बंधनकारक असेल, तोपर्यंत प्रति मिनिट सहा पैशांप्रमाणे ग्राहकांकडून शुल्कवसुली करण्यात येणार आहे. मात्र, हे शुल्क ‘जिओ’च्या ग्राहकांनी अन्य ‘जिओ’ यूजरच्या क्रमांकावर केलेले कॉल, व्हॉट्सअॅप, फेसटाइम आदी प्लॅटफॉर्मचा उपयोग करून करण्यात येणारे फोन आणि लँडलाइन कॉल्स आदींवर लागू होणार नसल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी (२०१७) दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने ‘इंटरकनेक्ट यूसेज चार्ज’ प्रति मिनिट १४ पैशांवरून घटवून सहा पैशांवर आणण्यात आले. त्या वेळी हे शुल्क जानेवारी २०२०पासून रद्द करण्याचीही घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता ‘ट्राय’ने या संदर्भात शुल्क रद्द करण्यासाठी आणखी वेळ देण्याची आवश्यकता आहे का या विषयावर शिफारस मागवली आहे. ‘जिओ’च्या नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग मोफत आहे. मात्र, त्यामुळे कंपनीला भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आदी अन्य ऑपरेटर्सना करण्यात आलेल्या कॉल्ससाठी १३,५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
‘ट्राय’च्या या भूमिकेमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ‘जिओ’ने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नेटवर्कवर करण्यात आलेल्या कॉलसाठी प्रति मिनिट सहा पैसे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथमच जिओच्या ग्राहकांकडून व्हॉइस कॉलसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्या ‘जिओ’तर्फे केवळ डेटासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारण्यात येते. कंपनीतर्फे देशभर कोठेही आणि कोणत्याही नेटवर्कवर व्हॉइस कॉलची सुविधा पूर्णपणे मोफत आहे. सध्या ‘जिओ’च्या नेटवर्कवर अन्य स्पर्धक कंपन्यांकडून येणारे इनकमिंग कॉल मोफत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |