06:43pm | Apr 06, 2018 |
सातारा : धावपळीच्या रोजच्या जिवनात दोन दिवस आनंदाने निसर्गाच्या सानिध्यात व्यतित करण्यासाठी मध्यमवर्गीय व व्यापारी पर्यटनाला जातात. त्यामुळे पुन्हा एकदा ताजेतवाणे होवून आपल्या नोकरी, व्यवसायात मग्न होतात. ग्रामीण मातीशी नाळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील नामांकित कृषी पर्यटन केंद्राने नावलौकिक प्राप्त केला आहे. परंतू काही कृषी पर्यटन केंद्राच्या बोगसगिरीने पर्यटकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. याची गंभीर दखल या व्यवसायिकांनी घ्यावी, अशी धोक्याची घंटा वाजत आहे.
छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून सातार्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. तसेच नैसर्गिक वरदान लाभल्यामुळे येथील पर्यटनस्थळाला जागतिक वारसा लाभला आहे. धार्मिक स्थळ म्हणून वाईचा ढोल्या गणपती, मांढरदेवची काळूबाई, कुसुंबीची काळेश्वरी, समर्थांचे सज्जनगड, पालीचा खंडोबा, गोंदवलेचे गोंदवलेकर महाराज, पुसेगावचे सेवागिरी, जावलीतील मेरुलिंग, औंधची यमाईदेवी, बावधनचे बगाड, चाफळचे श्रीराम मंदिर, म्हसवडचे श्री सिद्धनाथ, लिंबचे कोटेश्वर, धावडशीचे ब्रह्मेंद्र स्वामी, कास पठारावरील घाटाई देवी, आगाशिवनगर येथील बौद्ध लेणी, खातगुणचा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेला उरुस, पाटणचे गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्त सातारा जिल्ह्याच्या भेटीसाठी येतात. त्यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पर्यटनस्थळी तर अनेकांची उपजिविका पर्यटनावरच अवलंबून आहे. त्यातच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी पर्यटनाला चालना दिल्यामुळे सध्या दोन डझन अधिकृत व अनाधिकृत कृषी पर्यटन केंद्र सातार्यात स्थापित झालेली आहेत. या कृषी पर्यटन केंद्रामध्ये अबालवृद्धांपर्यंत मनोरंजन, सेंद्रीय शेतीवर आधारित भाज्यांचे जेवण, ताजे दूध, बैलगाडीची सफर, पोहोण्याचे तलाव, पारंपारिक पद्धतीचे खेळ व लुप्त झालेली सणासुदीची कला याचेही दर्शन याठिकाणी पर्यटकांना होते. तसेच घरगुती पद्धतीच्या निवासाची सोय, जात्यावरील दळण, चुलीवरील भाकरी व ग्रामीण ढंगातील म्हाद्या, खर्डा, ठेचा, पुरणपोळी याचा आस्वाद घेवून पर्यटक तृप्त होत आहेत. अशा पर्यटन केंद्रांमुळे पर्यटनाचा आनंद द्विगुणित होत आहे. याबद्दल कोणाच्याही मनात काहीच शंका नाही.
सध्या पर्यटनाच्या नावाखाली कास, महाबळेश्वर, पाचगणी, सज्जनगड, प्रतापगड, ठोसेघर, कोयनानगर रस्त्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त अनेक कृषी पर्यटन केंद्रांचे फलक लटकू लागले आहेत. यामध्ये पर्यटकांसाठी नेमक्या कोणत्या सुविधा आहेत? याची माहिती नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून ते रात्री मच्छरांपासून बचाव करण्यासाठी लागणार्या कॉईलसुद्धा विकत घ्याव्या लागतात. गावात मिळणार्या वस्तूंपेक्षा 30 ते 40 टक्के वाढीव दराने जिवनावश्यक वस्तू विकल्या जातात. पण याबाबत अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही. कृषी पर्यटन केंद्राच्या निकषाचीही काहींनी अंमलबजावणी केलेली नाही. सातार्यातील काही शासकीय अधिकारी व इतरांची मर्जी सांभाळली की आपला हेतू साध्य होतो, असा नवीन पॅटर्न राबविल्यामुळे कृषी पर्यटन केंद्राला मिळणार्या विकतच्या प्रसिद्धीमुळे काही पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटकांनी संपूर्ण खात्री करुनच अशा कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यावी. अन्यथा त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील प्रामाणिक व कृषी क्षेत्राला चालना देणार्या पर्यटन केंद्रांबद्दल आदर आहे. परंतू पर्यटकांच्या होणार्या लुटीबाबत मौन धारण करणार्या प्रवृत्तीविरोधात लढा तीव्र करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |