कराड : डोक्यात कोयता घालून मजुराचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. 13) सकाळी उघडकीस आली. कराड तालुक्यातील शेरे येथील कॅनॉलजवळ संबंधित मजुराचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारीच कोयता व चोरीची मोटारसायकल आढळून आल्याने नेमका खून कशासाठी? व कोणी केला? हे समजू शकले नाही. दरम्यान, पोलिस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. महादेव मीनाजी उसूरकर (वय 30, रा बाळेअंकली, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेरे येथील काही महिला शेतकरी शनिवारी सकाळी आपल्या शेतात निघाल्या होत्या. कॅनॉलजवळून जात असताना त्यांना तेथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शेजारीच रक्ताने माखलेला कोयता दिसला. त्यामुळे संबंधित महिलांनी ही बाब शेरे गावच्या पोलिस पाटलांना सांगितली. पोलिस पाटील यांनी घटनेची खात्री करून त्वरित याबाबतची माहिती कराड तालुका पोलिसांना दिली.
त्यानंतर डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्यासह पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ व पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर यांनी त्वरित पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना संबंधित व्यक्तीचा मृतदेह त्याच्या बाजूलाच कोयता व तेथून जवळच मोटरसायकल पडल्याचे दिसून आले. तसेच पोलिसांना संबंधित व्यक्ती जवळ काही महत्त्वाची कागदपत्रे सापडले असून त्यावरून पोलिसांना संबंधित व्यक्तीची ओळख पटली आहे. सापडलेल्या कागदपत्रावरून संबंधित व्यक्तीचे नाव महादेव उसूरकर असे असल्याचे समजले.
तेथे पडलेल्या मोटार सायकलीच्या नंबरवरून पोलिसांनी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित मोटरसायकल चोरीची असल्याचे निदर्शनास आले. संबंधिताजवळ सापडलेल्या कागदपत्रांवरून पोलिस नेमका खून कशासाठी झाला? कोणी केला? तसेच ज्याचा खून झाला आहे त्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याचा तपास करत आहेत. घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |