12:48am | Feb 22, 2020 |
सातारा : सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुरु असलेल्या विविध वैदिक व धार्मिक कार्यक्रमांची सांगता आज दुपारी पूर्णाहतीने करण्यात आली. आज सकाळी साडेसात पासून सुरु झालेल्या लोककल्याणकारी, रोगनिवारक, पापनाश तसेच सुख, शांती व समृध्दि देणार्या रूद्राचे अनुष्ठानात ब्राह्मणांकडून रुद्राची आवर्तने करत हवनकुडांत समीधा व आहूति देण्यात आल्या. तसेच या हवनाची सांगता उमामहेश्वर पाठशाळेचे प्रमुख वेदमूर्ती दत्तात्रय रमाकांत जोशी यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. मंदिरातील मूलनाथेश्वरास महाशिवरात्री निमित्त विशेष पुजा करुन फुलांची सजावट करण्यात आली होती.
या महारुद्र अनुष्ठानात महाआरतीचे नंतर 4 वेदांचे सेवा, अष्टावधान सेवा, अभिषेक संपन्न झाला. पूर्णाहूती नंतर महामंगल आरती, श्री मुलनाथेश्वर पिंडीस महारूद्र कलश महाभिषेक, लघुरुद्र तसेच रात्री 8 ते 12 या वेळेत श्री नटराज पाचू पिंडीस कलशाभिषेक करण्यात आला.
मूलनाथेश्वरास कलाभिषेक घालण्यापूर्वी सर्व ब्रह्मवृंदांनी या पूचन केलल्या कलाशाची शंखध्वनी आणि वाद्यांच्या गजरात मंदीराचे प्रांगणात मिरवणुक काढली होती व हे वेदमंत्रांनी सिध्द केलल्या जलाचा अभिषेक हरहर महादेव च्या जयघोंषात मूलनाथेश्वराला घालण्यात आला. हा अभिषेक पहाण्यासाटी भक्तांनी अलोट गर्दीं केली होती. दरम्यान सातारच्या जिल्हा पोलीस प्रमुख सौ. तेजस्वी सातपुते यांनी मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग यांनी मंदिराच्या वैशिष्ठंयाबदद्ल त्यांना सविस्तर माहिती दिली. सौ.आंचल घोरपडे यांनी सातपुते यांचा शाल, प्रसाद देउन सत्कार केला.
यावेळी मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग व त्यांच्या पत्नी सौ. उषा शानभाग, विश्वस्त मुकुंद मोघे, रणजीत सावंत, नारायण राव, वासुदेवन नायर, व्यवस्थापक चंद्रन, राहूल घायताडे, सौ. कांचन शहाणे, रमेश हलगेकर, वेदमूर्ती जगदिश भट गुरुजी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आरतीचा व रुद्र पुजनाचा लाभ घेतला. यावेळी या धार्मीक महारुद्र कार्यक्रमात सातारा येथील वेदमूर्ती जोशी यांचेसह माधव भिडे, नचिकेत भिडे, रोहीत आपटे, श्रीयश भिसे, शशांक जोशी, संकेत पुजारी, आदित्य कुलकर्णी, यशोधन जोशी, कुलकर्णी ब्रह्मवृंद सहभागी झाले होते. महाशिवरात्री निमित्त मंदिराचे परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराचे प्रांगणात उभारेलल्या भव्य मंडपात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. तसेच नटराज दर्शंनासाठी भावीकांनी दिवस रात्र उशीरापयंर्र्ंत रांगा लावल्या होत्या. संपूर्ण नटराज मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच गोपुरावर टाकलेल्या सातरंगी आकर्शक एलईडी झोतामुळे मंदिराचे वैभव अधिकच खुलून दिसत होते.
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |
छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध |
पालिका शाळेत ४०० जागांसाठी ११५७ अर्जांची विक्री |