02:33am | Jan 21, 2019 |
सातारा : पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणार्या बांधकाम विषयक रचना 2019 या प्रदर्शनाच्या भव्य मंडप व स्टॉल उभारणीचा शुभारंभ बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष सयाजी चव्हाण असोसिएशनचे सर्व माजी अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य व अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते व असोसिएशनचे पदाधिकारी सदस्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करून व श्रीफळ फोडून जिल्हा परिषद मैदान येथे झाला.
यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष सयाजी चव्हाण म्हणाले की पुण्या -मुंबईच्या तोडीस तोड रचना हे प्रदर्शन बिल्डर्स असोसिएशन आयोजित करते. यंदाच्या वर्षीच्या रचना प्रदर्शनातून विकसीत होणारे सातारा ही सातारची ओळख संपुर्ण राज्याला या प्रदर्शनाद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करू इच्छीणार्या दिग्गजांपासून ते आपले घर हे स्वप्न बाळगणार्या सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. गृहप्रकल्पांचे एकाच ठिकाणी विविध पर्याय बघण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. बांधकाम तंत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पध्दती यामुळे नागरिकांना त्यांच्या राहत्या शहरात विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. मागील दहा रचना प्रदर्शनांचा अनुभव व वाढता प्रतिसाद पाहून जिल्हा परिषदेच्या भव्य मैदानावर या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात अनेक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणार्या सातारा व अन्य जिल्ह्यातील कंपन्या सहभागी होणार आहेत. ग‘ाहकांना खात्रीची व विश्वासार्ह सेवा मिळावी हाच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचा मु‘य हेतू आहे. पश्चिम महराष्ट्राचे आकर्षण असणार्या रचना 2019 या बांधकाम विषयक भव्य प्रदर्शनास सातारा जिल्ह्यातील सर्वांनी आवश्य भेट द्यावी असे आवाहन बिल्डर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात बांधकाम प्रकल्पांबरोबरच गृहसजावट, कन्स्ट्रक्शन मशिनरी, फर्निचर, सिक्युरिटी सिस्टीम्स्, सोलर सिस्टिम, गॅस गिझर, किचन अॅक्सेसरीज यासारखे विविध आकर्षक स्टॉल बघायला मिळतील. प्रदर्शनात एकूण 101 स्टॉल्स आहेत. खवैय्यांसाठी फूड मॉलची व्यवस्था प्रदर्शनस्थळी केली आहे. या प्रदर्शनाचे मु‘य प्रायोजकत्व कालिका स्टील यांनी व सहप्रायोजकत्व कुपर कार्पोरेशन व एचडीएफसी होम लोन्स यांनी स्वीकारले आहे. हे प्रदर्शन जिल्हा परिषद मैदान येथे दिनांक 31 जानेवारी, 1,2, व 3 फेब‘ुवारी 2019 दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्व नागरिकांना विनामूल्य खुले राहील.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |