02:16am | Apr 22, 2019 |
बिजवडी : माण खटाव मतदारसंघात गेली दहा वर्षे स्वखर्चातून जनतेच्या प्रेमाखातर कोट्यावधी रूपयांची विकासकामांबरोबरच टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांना अखंडपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. कष्टातून मिळवलेल्या पैशातून सामाजिक बांधीलकी म्हणून जनतेसाठी मी त्यातील काही हिस्सा खर्च असतो अन कायमच करत राहणार आहे. विधानपरिषद निवडणूकीला माझ्याकडून पैसे घेतले असे म्हणणारे राजेंसाहेबांना माझे एकच सांगणे आहे. तुमच्याच मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात विधानपरिषदेच्या मतांसाठी कोणी कोणी किती पैसे घेतले अन मते कोणाला दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत ते योग्यवेळी ते दाखवून देऊ. घाटा खालून येऊन जर धमक्या देत असाल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अन हा तुमच्याकडे भीक मागण्याची वेळ माझ्यावर कधीच येणार नाही. त्यामुळे बोलताना जरा जपूनच बोलत जा असा इशाराही शेखर गोरेंनी दिला आहे.
वडूज ता.खटाव येथे महायुतीचे माढा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रणजितसिंह ना.निंबाळकरांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.यावेळी महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेखर गोरे म्हणाले, दुष्काळी माण खटाव तालुक्यात आघाडी सरकारने वर्षानुवर्षे सिंचन योजना रखडवल्या.तर माणच्या १६ गावांची हक्काची धोम बलकवडीची योजना रामराजेंनी फलटण तालुक्यात नेण्याचे पाप केले आहे.
युतीचे सरकार येताच उरमोडीसारख्या योजना मार्गी लागल्याने दुष्काळी भागात पाणी आले. आताही पाण्यापासून वंचित राहणाऱ्या गावांना जिहे कटापूर, उरमोडी, तारळी, टेंभू, ब्रम्हपुरी योजनांतले पाणी युतीच्या माध्यमातून माण खटाव तालुक्यात लवकरच येणार आहे. दुष्काळी तालुक्यांना शाश्वत पाणी मिळवण्यासाठी पुन्हा एकदा केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येणे गरजेचे आहे. यासाठी आपण पाण्याच्या विषयावर राष्ट्रवादीच्या विरोधात जावून महायुतीच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केला आहे. माढ्याची बारामती करू म्हणून फसवणाऱ्या राष्ट्रवादीला मत देऊ नका. त्यामुळे आता युती सरकारच्या माध्यमातून आपल्यालाच माण खटाव सुजलाम सुफलाम करायचा आहे. यासाठी महायुतीच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहून मोठ्या मताधिक्क्याने रणजितसिंह ना. निंबाळकरांना निवडून द्यावे असे आवाहन शेखर गोरे यांनी केले आहे.
माण पंचायत समितीत माझ्या नेतृत्वाखाली निवडून आलेल बांडगुळ दहिवडीत पवार साहेबांच्या सभेत म्हणतय की आजच्या सभेची गर्दी विरोधकांना विचार करायला लावणारी आहे. मात्र आता ते बांडगुळ विसरून गेलय की पंचायत समितीच्या निवडणुकीत मी त्याच ठिकाणी १५ हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सभा घेतली होती. त्या सभेचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही. महाआघाडीतील घटक पक्षातील साडे चार हजार कार्यकर्त्यांच्या गर्दीला हे खूप मोठी गर्दी असल्याचे सांगतय. येणाऱ्या काळात निवडून आणूनही गद्दारी करणाऱ्यांना बांडगुळांना धडा शिकविला जाणार आहे. माण खटावच्या जनतेला चांगले माहीत आहे.जनतेसाठी कोण झटतय ते त्यामुळे माण खटावची स्वाभिमानी जनता नक्कीच महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. महाआघाडीला विशेषत: माण मतदारसंघातील राष्ट्रवादीला मतदानाच्या रूपाने त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहनही त्यांनी केले.
राणीसाहेब ...'मोका' तुमच्या घरी पिकतोय की काय...!
राणीसाहेब म्हणतात शेखरला दुसऱ्यांदा मोका लागणार आहे. मोका काय तुमच्या घरी पिकतोय की काय.. राणीसाहेब मला जेवढ्या वेळात विरोधकांनी व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मोका लावण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा कमी वेळात त्यातून सत्याच्या जोरावर मी बाहेर पडलोय. मला दुसऱ्यांदा मोका लावायच नाद सोडून द्या.
मिस्टर रामराजे साहेब तुम्ही काय दाऊद लागून गेला की काय...
राष्ट्रवादीचे कटकारस्थानी नेते मिस्टर रामराजे म्हणतायत की मी २३ तारखेनंतर माणमध्ये बसूनच आहे. त्यावर शेखरभाऊ म्हटले की तुम्ही काय दाऊद लागून गेलात की काय.. इथ बसून काय करणारय हे काय पाकिस्तान आहे का..? माण मतदारसंघात फलटणसारखी हुकूमशाही नाही चालत इथं लोकशाही चालते. मी कोणाच्याही बापाला घाबरत नाही. साहेब मी पण २३ तारखेनंतरची वाट पाहीन, अशाप्रकारे शेखर गोरे यांनी मिस्टर रामराजेंचा समाचार घेतला.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |