सातारा : येथील तामजाईनगरमध्ये मध्यरात्री तलवार नाचवून दहशत माजवणार्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अटक केली. संशयितांकडून तलवार व विनाक्रमांकाची दुचाकी जप्त केली आहे. दरम्यान, एकजण रेकॉर्डवरचा संशयित गुन्हेगार असून एलसीबीच्या या कारवाईने गुंडांपुंडांची तंतरली आहे.
अक्षय उर्फ स्वप्नील सुरेश भोसले (वय 28, रा.तामजाईनकर) व अक्षय महादेव धनवडे (वय 24, रा. मोळाचा ओढा, शाहूपुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एलसीबीचे पोलिस हवालदार प्रमोद सावंत यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 30 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे ऑल आउट व कोंम्बिग ऑपरेशन सुरु होते. तामजाईनगर परिसरातील रुद्राक्ष अपार्टमेंटनजीक दोन युवक तलवार घेवून दहशत घालत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संशयित दोन युवक हातामध्ये धारदार तलावर घेवून फिरत असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले.
पोलिसांनी दोघा संशयितांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या मुसक्या आवळल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले. दोघांची नावे विचारली असता त्यातील अक्षय भोसले हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे समोर आले. पोलिसांनी तलवार, व दुचाकी जप्त करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. संशयित दोघे, हत्यार व दुचाकी हे सर्व शाहूपुरी पोलिसांकडे वर्ग केले.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्हाड, पोलिस हवालदार बापू मोरे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, विशाल पवार, अमोल जाधव, संतोष माळी, विक्रम पिसाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |