06:24pm | Oct 09, 2018 |
सातारा : राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची बदनामी करणार्या नालायक जेम्स लेनचे प्रकरण क्षुल्लक आहे, असे काल झालेल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य करणार्या माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांचा शेलक्या भाषेत समाचार घेत संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी डॉ. येळगावकर यांची भाजपमधून हकालपट्टी करावी तसेच डॉ. येळगावकरांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागावी, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.
काल दि. 8 रोजी माजी आ. तथा भाजप नेते डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेवून सातार्याचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमधून निवडणूक लढवावी, असे आवाहन केले होते. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने खा. उदयनराजेंना झुलवत ठेवले आहे, अशा पक्षात उदयनराजेंनी थांबू नये. खा. उदयनराजे स्वाभिमानी आहेत. ते भाजपमध्ये आल्यास त्यांचा सन्मान केला जाईल, असे आवाहन केले होते. तसेच जेम्स लेनबाबत बोलताना पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारांची लढाई विचारांनी होईल, असे सांगितले होते. मात्र अशा क्षुल्लक कारणावरुन उदयनराजेंनी भाजपचा राजीनामा दिला. मात्र जेम्स लेन प्रकरणाचे मी समर्थन करीत नाही. उदयनराजेंना राजीनामा न देताही संबंधित पुस्तकावर बंदी आणता आली असती. इतर मार्गाचा अवलंबही करता आला असता, असे वक्तव्य डॉ. येळगावकर यांनी काल केले होते. आज या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. ज्या जेम्स लेनने राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली, त्या जेम्स लेनचे प्रकरण क्षुल्लक, असे वक्तव्य करणार्या डॉ. येळगावकर यांचा आम्ही निषेध करतो. त्यांनी शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येवून नाक घासून महाराष्ट्रातील समस्त जनतेची माफी मागावी. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डॉ. येळगावकर यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |