03:24pm | Nov 15, 2018 |
फलटण : कुंभारटेक-गोसावीवस्ती, मलटण ता. फलटण येथे सुरु असलेल्या अवैद्य जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात गेलेल्या फलटण शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर येथे वास्तव्यास असणाऱ्या पुरुष व महिलांनी तुफान दगडफेक करत पाच पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केले. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पुरुष व महिलांसह सुमारे 23 ते 24 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल दिनांक 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पावणे नऊच्या दरम्यान कुंभार-टेक गोसावीवस्ती, मलटण ता. फलटण येथे अवैद्य जुगार अड्डा चालू असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी वरील ठिकाणी छापा मारण्याचा प्रयत्न केला असता, या ठिकाणी मोठा जमाव जमला या जमावाने पोलीस कारवाईत अडथळा निर्माण केला. पोलिसांनी यावेळी पोलीस बाळाचा वापर केला असता, महिला व पुरुषांच्या एका गटाने पोलिसांवर दगड विटा भिरकावून तुफान हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी काकडे, दडस, सोनवलकर, येळे, कांबळे, तसेच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे जखमी झाले. त्यांच्यावर फलटण येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी संतोष जगन्नाथ घाडगे, किरण विजय घाडगे, जीवन विक्रम घाडगे, उज्वला युवराज घाडगे, अंजू संजय वाघमारे, बबीता शिवाजी मोरे, कमल रामराव जुवेकर, युवराज जगन्नाथ घाडगे, विजय जगन्नाथ घाडगे, किरण जगन्नाथ घाडगे, मीना विजय घाडगे, रेशमा किरण घाडगे, नाना बाळू जाधव तसेच इतर सात ते आठ अनोळखी महिला व पुरुषांवर गुन्हा नोंद झाला असून, याप्रकरणी ४ महिला व चार पुरुष असे मिळून आठ संशयितांना अटक करण्यात आली असून, इतर संशयित आरोपींचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांनी तक्रार दिली असून फलटण शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बुरसे अधिक तपास करीत आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |