01:52am | Jan 29, 2020 |
कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून व सह्याद्रिचे संस्थापक स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आज बिनविरोध झाली. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया 6 जानेवारीला सुरू झाली. यात सुमारे 165 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 28 जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपला जलवा दाखवित अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर दुपारपर्यंत उर्वरित सर्व जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने कारखान्याच्या 21 जागांसाठी 21 उमेदवार बिनविरोध झाली. त्या इच्छुकांचे व सभासदांचे पत्रकार परिषदेत आभार मानले.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहीर झाली होती. त्यासाठी कराड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली या गटांसह अन्य प्रवर्गातुन 145 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दाखल केलेल्या उमदेवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज सकाळ पासूनच सहकारमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी इच्छुकांनी गर्दी केली होती. काही गटातील इच्छुकांनी पाटील यांना तुम्ही निर्णय घ्या, असे सुचवले तर काही ठिकाणी पाटील यांना मध्यस्थी करावी लागली. सहकारमंत्री पाटील यांच्या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिल्याने 21 उमेदवारांसह अन्य इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
त्यानंतर बोलताना सहकारमंत्री पाटील म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचाराने निवडणूक बिनविरोध झाली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी माझ्यावर सहकार खात्याची राज्याची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर काही दिवसातच कारखान्याची निवडणूक लागली. त्यामुळे मला जास्त वेळ देता आला नाही. मात्र सह्याद्रीच्या सभासदांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याने आणि इच्छुकांनी काही ठिकाणी आपसात समजुत करुन आणि काही ठिकाणी मी निर्णय घेतल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. त्यातुन कारखान्याचे 42 लाख रुपये वाचले आहेत. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत असतानाही सह्याद्री कारखान्याने जादा दर दिला आहे. मात्र सभासदांच्या ऊसाचे गाळप होण्यासाठी विस्तारवाढ करणे आवश्यक आहे. नवीन संचालक मंडळाचा कारखान्याची विस्तारवाढ आणि अपुर्या सिंचन योजना पुर्ण करणे हे ध्येय असेल. निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचेही सहकार्य राहिले. पालिकेच्या निवडणुकीतही ही आघाडी राहिल असेही ते यावेळी म्हणाले.
शेतकर्यांना कोणताही त्रास न होता कर्जमाफीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हावे यासाठी सरकारने महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे, लिंकींगच्या माध्यमातुन एक फेब्रुवारीपासुन शेतकर्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास प्रारंभ होईल. त्याचबरोबर जे नियमीत कर्जदार आहेत त्यांच्यासाठीही शासनाने निर्णय घ्यायचा ठरवले आहे. त्यासाठी मंत्र्यांच्या उपसमिती नेमली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मी, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, दादाजी भुसे अशा आमच्या सहा मत्र्यांचा समावेश आहे. त्या समितीची पहिली बैठक झाली आहे. लवकरच नियमीत कर्जफेड करणार्यांनाही न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |