09:14pm | May 04, 2018 |
सातारा : मराठी साम्राज्याचा अटकेपार विस्तार करताना ज्या तख्ताच्या वाड्यातून कारभार झाला येेथील खलबत खान्यांची स्वच्छता उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, बांधकाम सभापती मनोज शेंडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, महिला बालकल्याण सभापती अनिता घोरपडे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. यावेळी नगरसेविका लत्ता पवार, किशोर शिंदे, रजनी जेधे, विजय काटवटे, सागर साळुंखे, सविता फाळके, सागर पावशे ज्ञानेश्वर फरांदे आणि पालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राजधानी साताऱ्यात शिवनातू व संभाजीपूत्र छ. शाहूंना जयंतीनिमित्त अभिवादन केले जात असून याचे अनुकरण राज्यात नव्हे तर देशात व्हावे, अशी इच्छा किशोर शिंदे यांनी व्यक्त केली. साताऱ्याची शान असलेल्या वास्तूंचे संवर्धन केल्यास ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळणार असल्यामुळे सातारकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे विजय काटवटे यांनी स्पष्ट केले. उपस्थित नागरिकांना पालिकेच्या उपक्रमाची थोडक्यात माहिती लत्ता पवार यांनी दिली. यावेळी नागरिकांसाठी छ. शाहू उद्यानात जॉगिंग ट्रॅक उभारणाऱ्या भावे उद्योग समूहाच्या वृषाली भावे उपस्थित होत्या.
तत्पूर्वी, खलबत खान्यांची स्वच्छता करताना सुरुवातीला राजेशिर्के यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. हातात झाडू, खोरे आणि घमेले घेऊन पदाधिकारी सरसावल्यामुळे बागेत आलेले अबाल-वृद्ध आणि लहानगी मुलेही श्रमदानात सहभागी झाली होती. नागरिकांनी स्वच्छता मोहीमेत उत्स्फूर्त सहभाग घेताना खलबत खाने पर्यटक आणि सातारकरांसाठी खुले करताना सोबतच उद्यानाच्या समोर असलेल्या विहरीवरील मदारी हत्तीचे शिल्प छ. शाहू उद्यानात बसवण्याची आग्रही मागणी उपाध्यक्ष राजेशिर्के यांच्याकडे केली. यावेळी छ. शाहू कालीन वास्तूंचे जतन करण्याची मोहीम सुरू झाली असून महादरे तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. रंगमहालही भविष्यात पालिकेच्या अखत्यारीत घेण्यासाठी प्रयत्न करणार असून राजधानी साताऱ्याचे वेगळे महत्व जगाच्या पटलावर मांडण्यासाठी सक्रिय राहणार असल्याचे राजेशिर्के यांनी सांगितले. या स्वछता मोहिमेत डंपर भरून कचरा काढण्यात आला. सातारा मध्ये अनेक भागात आरोग्य विभागाच्यावतीने स्वच्छता मोहीमा सुरूच राहणार असल्याचे आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी सांगितले.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |