सातारा : गेल्या काही वर्षांमध्ये सातारा महसूल विभागाचा परफार्मन्स थंडावलेला आहे. वाळू, बोगस सातबारा प्रकरणामुळे महसूल विभागाची जिल्ह्यासह राज्यभरात नाचक्की झालेली आहे. अनेक प्रलंबित प्रकरणे व तक्रारींमध्ये लेट लतिफीमुळे अनेकांचे फावलेले आहे. त्यामुळे महसूलची लेट लतिफी नक्की कोणाच्या पथ्यावर? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाळू, तेटली येथील बोगस सातबारा प्रकरणांमुळे सातारा महसूल विभागाचा ग्राफ डाऊन झालेला आहे. अधिकार्यांमध्येच मेळ नसल्यामुळे सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षा दुरापास्त झाली आहे. तहसिलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात रोज शेकडो तक्रारी व तत्सम अर्ज येत असतात. मात्र या अर्जाची वर्षानुवर्षे दखल घेतली जात नाही. तक्रारदाराचे खेटे मारुन पायताणे झिजतात, परंतू अधिकार्यांच्या हृदयाला मात्र पाझर फुटत नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे.
8 एप्रिल 2015 रोजी म्हणजेच सुमारे तीन वर्षापूर्वी मौजे रेंगडेवाडी, ता. जावली येथील सर्व्हे नंबर 27 ई मधील प्लॉट नं 380 फेज 2 मधील अनाधिकृत बांधकामाबाबत निंबळक, ता. फलटण येथील जयपाल महादेव भोसले यांनी उपविभागीय अधिकारी सातारा यांच्याकडे याबाबत तक्रारी अर्ज केला होता. मात्र तीन वर्षानंतरही या तक्रार अर्जावर कसल्याही प्रकारची कार्यवाही मेढा तहसिल कार्यालय, प्रांत कार्यालय सातारा यांच्याकडून करण्यात आली नाही. जयपाल भोसले यांनी याबाबत दोन्ही कार्यालयांना स्मरणपत्रही दिले होते. मात्र या स्मरणपत्रांनाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे. राज्यात महसूल विभागाकडून झिरो पेन्डन्सीचे काम जोरात आहे. विभागीय आयुक्तांकडून अनेकांनी या कामाबाबत पाठ थोपटून घेतली आहे. मात्र, झिरो पेन्डन्सी फक्त कागदावरच आहे. वास्तवात हजारो अर्ज निकाली न काढता ते प्रलंबित आहेत. रेंगडेवाडी येथील प्रकरणामुळे एक हिमनगाचे टोक यानिमित्ताने निदर्शनास आले आहे.
मेढा तहसिलचे कामकाज आओ जावो, घर तुम्हारा पैसा फेको तमाशा देखो अशा पद्धतीने चालते. जयपाल भोसले यांच्या प्रकरणात तत्कालीन तहसिलदारांनी संबंधितांकडून मोठा मलिदा हाणला आहे. सध्याचे तहसिलदारही त्याच मार्गावर आहेत. तीन वर्षांपासून तक्रार अर्ज प्रलंबित आहे. मात्र त्यावर कसल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अवैध बांधकाम तसेच गौण खनिज उत्खनन करणार्यांना महसूलचे अभय आहे. त्यामुळेच महसूलमधील लेट लतिफी नक्की कोणाच्या पथ्यावर असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |