सातारा : सातारा जिल्हा कारागृहात संशयित आरोपी आजमीर अकबर मुल्ला (रा.नागठाणे ता.सातारा) याच्याकडे दोन सीम कार्डसह मोबाईल सापडला. त्याच्याविरुध्द अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, सिव्हील हॉस्पिटलमधील प्रिझन वॉर्डमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कारागृहात नेत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे सिव्हील प्रिझन वॉर्डबाहेरील पोलिसांचा बंदोबस्त पुन्हा एकदा संशयाच्या भोवर्यात अडकला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आजमीर मुल्ला याला सातारा शहर पोलिसांनी अपहरण व खंडणी प्रकरणात अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची सातारा जेलमध्ये रवानगी करण्यात आली. जेलमध्ये असताना त्याची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी सिव्हीलमधील प्रिझन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्याला डिस्जार्ज झाल्यानंतर पुन्हा कारागृहात नेण्यात आले.
आजमीर मुल्ला याला कारागृहात आत नेत असताना त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे मोबाईल सापडला. या घटनेने कारागृहात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकार्यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी पाहणी करुन शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार कारागृहचे पोलिस कर्मचारी ललितकुमार पांडूरंग पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, आजमीर मुल्ला याच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यासह कराड, इस्लामपूर, सांगली बेंगलोर येथेही शस्त्रास्त्रासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तो सिव्हीलच्या प्रिझन वॉर्डमध्ये होता. यामुळे त्याच्यापर्यंत मोबाईल कसा व कोणाच्या आशिर्वादाने गेला? असा सवाल उपस्थित झाला आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |