03:22am | Aug 31, 2019 |
सातारा : अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याप्रकरणी दीपक महादेव जांभळे (वय 49, रा. क्षेत्र महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर) याला अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायाधिश-2 एन.एल.मोरे यांनी 10 वर्ष शिक्षा व 50 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. दरम्यान, यातील पिडीत मुलगी ही नेपाळची असून निराधार असल्याने आरोपीच्या शेतामध्ये कामाला होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दीपक जांभळे हा स्ट्रॉबेरीची शेती करतो. जुन 2014 मध्ये त्याच्याकडे नेपाळवरून आलेली एक अल्पवयीन मुलगी शेतमजूर म्हणून काम करत होती. ती निराधार असल्यामुळे त्याच्याकडेच राहत होती. दरम्यान, दीपक जांभळे याने त्याच्या बायकोच्या पायाला आजार असल्याचे सांगून त्या अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यामध्ये ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. या घटनेनंतर संबंधित अल्पवयीन मुलीने दि. 10 ऑगस्ट 2014 महाबळेश्वर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची माहिती देवून त्याच्याविरुध्द तक्रार दिली. पोनि यांनी या गुन्ह्याचा तपास करून सातारा जिल्हा न्यायालयात दि. 9 जानेवारी 2015 रोजी आरोपपत्र दाखल केले.
सरकारी पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासले. सरकारी वकील सौ. मंजुषा तळवळकर यांनी आपल्या युक्तिवादात अल्पवयीन मुलगी गरोदर असताना तिचा गर्भपात करण्यात आला. त्या मुलीच्या डी.एन.ए टेस्ट घेतली असता आरोपीच्या डी.एन.ए.शी जुळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच ती मुलगी निराधार होती, आरोपीकडे राहायला होती. त्या अल्पवयीन मुलीवर आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केल्याची साक्ष दिल्याचे सांगत सर्व साक्षी पुरावे आरोपीच्या विरोधात असल्याचे सांगितले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी आरोपी दीपक जांभळे याला शिक्षा ठोठावली. या खटल्यामध्ये प्रोसेक्युशन स्कॉड सातारा व महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक भुजंगराव काळे यांनी सहकार्य केले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |