नवी दिल्ली : रेल्वेने सर्वात मोठी नोकरभरतीची तारीख जाहीर केली आहे. जवळपास 90 हजार पदं रेल्वेत भरली जाणार आहेत. त्यासाठी 9 ऑगस्टपासून परीक्षा घेतली जाणार आहे.
रेल्वेची ही ऑनलाईन परीक्षा देशातील सर्व महानगरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 26 हजार 502 जागा भरण्यात येणार आहेत.
असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही पदं पहिल्या टप्प्यात भरण्यात येतील. 26 जुलैपासून कोणाची परीक्षा कोणत्या शहरात आहे याबाबतची माहिती प्रसिद्ध होईल.
मात्र परीक्षार्थी आपलं ई-कॉल लेटर परीक्षेपूर्वी चार दिवस आधीच डाऊनलोड करु शकतील. म्हणजेच 9 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या परीक्षेचं ई-कॉल लेटर 5 ऑगस्टपासून डाऊनलोड करता येईल.
रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या 89,409 पदांसाठी रेल्वेने ऑनलाईन अर्ज मागवले होते. यासाठी देशभरातून 2.37 कोटी अर्ज आले आहेत.
पहिल्या टप्प्यातील असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही भरती होणार आहे. मात्र ग्रुप डी ची पदभरतीची परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
दरम्यान तीन टप्प्यात ही परीक्षा होणार आहे. 26 जुलैपासून Railway Recruitment Control Board च्या वेबसाईटवर परीक्षेबाबतची माहिती मिळेल.
परीक्षा रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी होणार नाही.
कशी असेल परीक्षा?
ऑनलाईन परीक्षा 60 मिनिटांची असेल. दिव्यांग परीक्षार्थींना अतिरिक्त 20 मिनिटे मिळतील.
या परीक्षेत 75 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे चार पर्याय उपलब्ध असतील.
चुकीचं उत्तर दिल्यास एक तृतीयांश गुण वजा केले जातील.
ग्रुप सी - परीक्षेचं प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी टिप्स
1 - rrb च्या वेबसाईटवर प्रवेश पत्र उपलब्ध झाल्यानंतर ते rrbcdg.gov.in यावरुन डाऊनलोड करता येईल.
2- rrbcdg.gov.in या वेबसाईटवर RRB Recruitment Group C Exam Admit Card यावर क्लिक करा
3 - परीक्षार्थी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करु शकतो
4- त्यानंतर Admit Card या टॅबवर क्लिक करा
5- तुमचं अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करु शकता, तसंच प्रिंटही घेऊ शकता.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |