10:16pm | Apr 25, 2019 |
सातारा : सातारा पालिकेच्या चतुर्थ वार्षिक पाहणीचा वनवास संपता संपेना. 2019 साला चा पाचवा महिना उजाडण्याची वेळ आली तरी साताऱ्यातील नव्या मिळकतींची गणना व त्याची कर आकारणी हा कार्यक्रम संपलेला नाही. प्रशासनाने शासनाच्या जिओ मॅपिंगचे कारण दाखवून कागदी घोडे नाचवण्याचा सरकारी छाप कार्यक्रम चालवला आहे. सातारा विकास आघाडीकडे ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रस्तावित घरपट्टी रचना करण्याची राजकीय इच्छाशकती नसणार हे उघड आहे. मात्र दर पंचवार्षिक निवडणुका व चतुर्थ वार्षिक पाहणी प्रक्रिया यांचा कालावधी एकच येत असल्याने राजकीय घोळात प्रमाणित कालावधीच्या तब्बल सहा महिने विलंबाने कर आकारणी होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे 2019-2023 च्या चतुर्थ वार्षिक पाहणीला केव्हा मुहुर्त लागणार हा विषय चर्चिला जाऊ लागला आहे.
नगरपालिका अधिनियम 1965 कलम 118 व 119 नुसार चार वर्षाच्या चतुर्थ वार्षिक पाहणीसाठी किमान वर्षभर आधी नव्या मिळकतींची नोंद, भोगवटा प्रकारातील बदल,मिळकतींच्या रचनेमधील बदल याची पाहणी करून नवीन करवाढ मुख्याधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेकडे प्रस्तावित करून सहाय्यक संचालक नगररचना यांची परवानगी घेणे आवश्यक असते. त्यानंतर प्रस्तावित करवाढीच्या सूचनेवर घरपट्टी आकारली जाते. त्याचा निर्णय अपिलिय समितीकडे अंतिम होउन नागरिकांना घरपट्टी मान्य नसल्यास योग्य दस्तऐवजांसह हरकत नोंदवता येते. मात्र निकडीच्या प्रक्रिया वेळेत झाल्यास एप्रिल 2019 ला नव्या घरपट्टीची बिले नियमाप्रमाणे लागू करता येणे क्रमप्राप्त आहे.
चतुर्थ वार्षिक पाहणी संदर्भात वसुली विभागाची तातडीची बैठक घेतली जाणार आहे . आता लोक सभा मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शासनाकडे जिओ मॅपिंगच्या प्रस्तावाचा पाठपुरावा सुरू आहे नियुक्त पथकांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. शंकरराव गोरे मुख्याधिकारी सातारा नगरपरिषद
आकडे काय सांगतात ?
एकूण मिळकती- 33000
अपेक्षित वाढ -13 टक्के
चालू घरपट्टी - घरगुती 5 रु व्यावसायिक 10 रू प्रति स्क्वेअर फुट
अपेक्षित महसूल साडेनऊ कोटी थकबाकी - अकरा कोटी
साताऱ्यात दरवेळेस सातारकरांच्या नावे मतांचे राजकारण खेळले जाते आणि अपवाद वगळता दहा वर्षापूर्वीच्या निरुपयोगी विकास योजना त्यांच्या माथी मारल्या जातात.सातारा पालिका ही मातृसंस्था असताना महसूल वाढीसाठी कधीच प्रयत्न गांभीर्याने झाले नसल्याचा विदारक अनुभव आहे. त्यामुळे प्रस्तावित चतुर्थ वार्षिक पाहणीला पुन्हा लोकसभा निवडणुकांचा गत पंचवार्षिक प्रमाणे राजकीय अडथळा असणार आहे. त्यामध्ये घरपट्टी वाढीचा बोजा निश्चितच सातारकरांवर टाकण्याची मानसिकता सातारा विकास आघाडीची नसणार. त्यातच स्वच्छता कर व मालमत्ता कर लागू करून सातारकरांना सुविधांच्या तुलनेत पेचात टाकण्यात आले. मागच्या चार वर्षाच्या दराप्रमाणे घरपट्टी भरताना पुढील चतुर्थ वार्षिक पाहणी येउन ठेपली त्यामुळे प्रत्येक चार वर्षात झालेला घरपट्टी आकारणीला झालेला विलंब हा राजकीय अडथळ्यांमुळेच झाल्याचे अगदी स्पष्ट आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |