07:48pm | Dec 09, 2019 |
सातारा : शासकीय अधिकारी, कर्मचारी हे त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतात, शारीरिक कष्ट नसल्याने त्यापैकी बरेच जणांना मधुमेह , उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. व्यायामासाठी वेळ मिळत नसल्याची सबब पुढे केली जाते. परंतु अन्न व औषध प्रशासनात राजपत्रित अधिकारी असलेले योगेश ढाणे यांनी शासकीय अधिकारी , कर्मचार्यांपुढे आदर्श रचला आहे.
आस्ट्रेलियातील बसलटन येथे झालेल्या आयर्नमॅन 140.6 ही स्पर्धा 17 तासात पूर्ण करावयाची असताना योगेश ढाणे यांनी ही स्पर्धा 14 तास 55 मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करत आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. आस्ट्रेलियातील बसलटन येथे होणारी ही जागतिक दर्जाची आयर्नमॅन 140.6 स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक स्वरुपाची असते. यामध्ये 3.8 कि.मी.हे अंतर समुद्रातून पोहणे, 180 कि. मी. सायकलिंग व 42.2 कि. मी. धावणे हे अंतर असे तीन प्रकार 17 तास या वेळेत पूर्ण करावयाचे असतात. दि. 1 डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धात भारत देशातर्फे सहभाग घेवून योगेश ढाणे यांनी ही स्पर्धा केवळ 14 तास 55 मिनिटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण करत आंतरराष्ट्रीय दर्जाचा मानाचा आयर्नमॅन हा किताब पटकावला आहे. योगेश ढाणे हे ठाणे येथे अन्न व औषध प्रशासनात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच व्यायामाची आवड असल्याने त्यांनी आज देखील हा छंद जोपासला आहे. यापूर्वी त्यांनी सातारा, पुणे, मुंबई, गोवा या ठिकाणी पार पडलेल्या 28 अर्ध मॅरेथॉन पूर्ण केल्या असून 2018व2019 सालात त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसेच त्यांनी यापुर्वी मलेशिया व गोवा येथे पार पडलेल्या आयर्नमन 70.3 या स्पर्धा विक्रमी वेळेत पुर्ण करून आयर्नमन किताब पटकवणारे ते पहिले राज्य शासकीय अधिकारी ठरले आहेत. मूळचे पाडळी, ता. सातारा गावचे सूपुत्र असून त्यांनी शासकीय सेवेत कार्यरत असताना देखील आपला व्यायामाचा छंद जोपासत मिळवलेले यश जिल्हयासाठी अभिनंदनीय असेच आहे.
आस्ट्रेलिया येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यापासून सरावास आरंभ केल्यानंतर अवघ्या अकरा महिन्यात त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. यासाठी त्यांना हैद्राबाद येथील ट्रायथलॉन प्रशिक्षक सुनील मेनन यांचे मार्गदर्शन लाभले तर फ्रान्सचे सहाय्यक प्रशिक्षक हेंझ व सातारा येथील ओपन वॉटर स्वीमिंगचे प्रशिक्षक सुधीर चोरगे व ओमकार ठेरे यांनीही मार्गदर्शन केले होते. ठाणे व सातारा येथे सराव करत होते. पैकी पोहण्याचा सराव त्यांनी उरमोडी धरण व उरण येथील समुद्रात केला. सायकलिंगचा सराव कराड-नाईकबा (ढेबेवाडी)मार्गावर केला तर धावण्याचा सराव त्यांनी मुंबई व ठाणे येथे केला होता. आपली शासकीय कामाची वेळ सांभाळत पहाटे 5 ते सकाळी 9 व सायंकाळी तर सुट्टीदिवशी ते पूर्ण वेळ सराव करत होते. या सरावातच परिपूर्ण डायटचीही जोड दिली होती. त्यामुळे आस्ट्रेलीयातील आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी 1तास 31 मिनिटे 10 सेंकदात समुद्रातील आस्ट्रेलियन एक्झिट प्रकारातील हे अंतर पूर्ण केले नंतर ट्रांझिट 1 साठी 10 मिनिटे 52 सेकंद वेळ लागला तर अत्यंत वारा असलेल्या खडतर मार्गावरून सायकलिंग करत 180 कि. मी. अंतर त्यांनी 6 तास 50 मिनिटात पूर्ण केले. ट्राझिट दोन साठी 10 मिनिटे 42 सेकंद वेळ देवून पुढे त्यांनी 42.2 कि. मी. धावण्याचे अंतर 6 तास 12 मिनिटे 17 सेकंदात पूर्ण करत एकूण 14 तास 55 मिनिटे या विक्रमी वेळेत फिनिश लाईन गाठत भारताचा तिरंगा आस्ट्रेलियात फडकवला. आयर्नमॅन 140.6 स्पर्धा पूर्ण करणारे ते राज्यातील पहिले शासकीय अधिकारी ठरले असून त्यांच्यावर क्रीडाक्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . त्यांच्यापासून प्रोत्साहन घेत शेकडो अधिकारी व्यायामकडे वळले असून अर्थ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेवू लागले आहेत. अन्न व औषध प्रशासना च्या आयुक्त डॉ पल्लवी दराडे मॅडम व प्रशासनातील सर्व अधिकारी यांनी दिलेलं प्रोत्साहन ही स्पर्धा पार करण्यासाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरले असे ढाणे यांनी सांगितले.
या यशाबद्दल त्यांचे आ.श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्री. छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, माजी जि प सदस्य राजू भोसले, अन्न व औषध प्रशासनचे उपायुक्त देसाई, सुरेश देशमुख, सातारचे सहा. आयुक्त शिवकुमार कोटगिरे, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, विविध क्षेत्रातील अधिकारी यांनी शुभेच्छा देऊन पूर्ण आयर्नमँन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |