सातारा : फेसबुकद्वारे ओळख झाल्यानंतर त्यावरच युवकाने युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. पहिली भेट घेण्याचे ठरल्यानंतर याच भेटीत युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी राजेश बाळासो भोसले (वय 23, रा.बदेवाडी ता.वाई) या युवकाविरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेे. धक्कादायक बाब म्हणजे संशयित राजेश हा सैन्य दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बलात्काराची घटना लिंब फाटा येथील धनश्री लॉजवर घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहेे.
याप्रकरणातील तक्रारदार युवती 19 वर्षाची आहेे. याबाबत अधिक माहिती अशी, राजेश हा सध्या सैन्यदलात कार्यरत आहे. तो फेसबुकवर असून फेसबुकद्वारे वाई तालुक्यातील एका युवतीशी त्याची ओळख झाली. फेसबुकवरील ओळख झाल्यानंतर दोघांचे चॅटींग सुरु झाले. प्रपोज झाल्यानंतर राजेश याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. अखेर दोघांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवले व त्यातूनच गुरुवारी दि. 24 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते भेटले. ही भेट सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लिंब फाटा येथे झाली. तेथेच परिसरात धनश्री नावाचे लॉज आहे.
एकांतात बोलण्यासाठी व लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी संशयित राजेश भोसले युवतीला लॉजवर घेवून गेला व दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या लॉजमधील खोलीत युवतीवर बलात्कार केला. या घटनेनंतर युवतीने लग्नाबाबत विचारणा केली. मात्र राजेश याने विवाहाबाबत नकार दिला. फसवणूक होत असल्याचे समोर आल्याने अखेर युवतीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिस ठाण्यामध्ये घडलेल्या घटनेबाबत युवतीने सांगून राजेश भोसले याच्याविरुध्द तक्रार असल्याचे सांगितले. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास फौजदार एस.बी. जाधव करत आहेत. पोलिस संशयिताचा शोध घेत असून शुक्रवारी दुपारपर्यंत तो सापडलेला नव्हता. दरम्यान, फेसबुकद्वारे ओळख झाल्यानंतर पहिल्याच भेटीत संशयिताने बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |