सातारा : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी सकाळी सांगली जिल्हा पोलिस दलातील पोलिस हवालदार अझरुद्दीन पिरजादे याला 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात घेवून अटक केली. पिरजादे हा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचा (एलसीबी)कर्मचारी आहे. दरम्यान, सातारा एसीबीने सांगली एलसीबीच्या कर्मचार्यावर ‘ट्रॅप’ लावून कारवाई केल्याने सातारा, सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगली पोलिस अझरुद्दीन पिरजादे हा सध्या सांगली एलसीबीमध्ये कार्यरत आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे वाळू व्यवसायिक आहेत. तक्रारदार वाळू वाहतुक करणार्या व्यवसायिकाला संशयित अझरुद्दीन पिरजादे याने वाळूवर कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येवून तक्रार दिली.
सातारा एसीबीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरिफा मुल्ला यांनी तक्रारदाराचा अर्ज वाचून कार्यवाहीला सुरुवात केली. सातारा एसीबीने पडताळणी केली असता संशयित अझरुद्दीन पिरजादे याने 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. काही काळ थांबल्यानंतर मात्र पिरजादे याने पैसे स्वीकारले नाहीत. पैसे स्वीकारत नसल्याने अखेर सातारा एसीबीने सोमवारी सकाळी सांगलीत जावून अझरुद्दीन पिरजादे याला ताब्यात घेतले. सांगली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द लाचेचा गुन्हा दाखल करुन पिरजादे याला अटक केली. ही कारवाई पोनि आरिफा मुल्ला यांच्या पथकाने केली आहे.
सातारा एसीबीचा सांगली पोलिसावर ट्रॅप झाला असल्याचे समोर आल्यानंतर सांगलीसह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात, लोकप्रतिनिधी यांनी लाचेची मागणी केली तर 1064 या टोल फ्री किंवा जिल्हा न्यायालयासमोरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |