महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील ऑर्थर सीट पॉईंटवरून बुधवारी सायंकाळी खोल दरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली असून विशाल भाऊसाहेब गायके (वय 21) रा. वासुंदे ता. पारनेर जि. अहमदनगर सध्या रा. मांडगे वस्ती नांदगाव ता. कर्जत असे असून प्रेयसीच्या मृत्यूमुळे नैराश्येने या युवकाने आपली जीवनयात्रा संपविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महाबळेश्वर येथील ऑर्थरसीट या प्रेक्षणीय स्थळावर विशाल गायके या तरूणाने बुधवारी खोल दरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. याबाबत महाबळेश्वर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विशाल व त्याची प्रेयसी दहावीपर्यंत एकाच शाळेत शिकत होते, त्यानंतर प्रेयशीने उच्चशिक्षणासाठी पुणे येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. मात्र, या मुलीला रक्ताचा कर्करोग होता. यामध्ये तिचे रुग्णालयात उपचारादरम्यान 29 ऑक्टोबर रोजी निधन झाले. याबाबतची माहिती विशालला कळताच घरच्यांना मित्रांना पुण्याला भेटण्यास निघालो आहे, असे सांगून तो घरामधून बाहेर पडला. तो पुण्याला गेला नंतर नैराश्य आलेल्या विशालने थेट महाबळेश्वर गाठले. बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ऑर्थरसीट पॉईंटवरून उडी घेऊन विशालने आपली जीवन यात्रा संपवली .
वडील भाऊसाहेब गायके यांनी मुलगा मिसिंग झाल्याची तक्रार 31 ऑक्टोबरला कर्जत पोलिस ठाण्यात दिली. कर्जत पोलिस ठाण्याने मोबाईलचे लोकेशन शोधले असता महाबळेश्वर लोकेशन मिळाले. या दरम्यान आत्महत्या कुणी केली? याचा शोध घेण्यासाठी पोलिस निरिक्षक दत्तात्रय नाळे व पोलिस कर्मचार्यांनी ऑर्थरसीट पॉइर्ंट परिसर शोधला असता तेथे एक एम एच 16 बी ई 4450 नंबरची दुचाकी आढळून आली. या दरम्यान वडील भाऊसाहेब गायके यांनी विशालला अनेक वेळा फोन केले, परंतु एकही फोन विशालने उचलला नाही. वडिलांना त्याने पाठवलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये स्वतःचे काही फोटो व सॉरी पपा... अशा आशयाचा मजकुर होता. वडिलांनी तू कोठे आहेस, तुला पैसे हवे असतील तर पैसे ट्रान्सफर करतो, तुझा अकौंट नंबर पाठव, असा मेसेज विशालला पाठवला होता.
विशाल हा कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात एस. वाय. बीए ला शिक्षण घेत होता तर त्याची प्रेयसी टाकळे डोकेश्वर या गावातील असून उच्च शिक्षणासाठी ती पुण्यात होती. गुरुवारी सकाळी 7 वाजता महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी विशाल गायके याचा मृतदेह वर काढण्यासाठी ऑर्थरसीटच्या खोल दरीत उतरण्यास सुरूवात केली. तब्बल तीस जवानांच्या मदतीने तीन हजार फुट खोल दरीत उतरून विशाल गायकेचा मृतदेह वर काढण्यात आला. घटनास्थळी एक शूज व मोबाईल मिळाला आहे. विशाल याचा मृतदेह वर काढण्यासाठी सात तासाचा कालावधी लागला.
महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनिल बाबा भाटिया, जयवंत बिरामणे ,अक्षय जाधव, संदिप जांभळे ,विलास कांबळे ,सनी बावळेकर,अनिल केळगणे तसेच अन्य पदाधिकारी व संयुक्त वनसमितीचे कर्मचारी यांनी याकामी सहकार्य केले.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |