03:05pm | Mar 19, 2020 |
फलटण : फलटण नगरपालिकेच्या वतिने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू असताना फलटण शहरातील हॉटेल न्यू आनंद विलास या हॉटेल चे अनधिकृत बांधकाम काढत असताना हॉटेल मध्ये अवैध घरघुती वापराच्या अवैध गॅस सिलेंडर टाक्या सापडल्या असून हॉटेल मालकांवरती फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाण जाणाऱ्या नागेश्वर मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या न्यू हॉटेल आनंद विलास या हॉटेल मालकाने अतिक्रमण करून आपल्या हॉटेल वरती दोन माजली अनधिकृतपणे पक्के बांधकाम केले होते फलटण नगर परिषदेच्या वतीने फलटण शहरात अतिक्रमणावरती नगर पालिकेने हातोडा मारला असून या हॉटेल चे अतिक्रमण काढतांना या हॉटेल च्या दुसऱ्या मजल्यावरती नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कित्येक गॅस भरलेल्या व मोकळ्या असलेल्या गॅस च्या टाक्या मिळाल्या सदरच्या टाक्या ह्या नगरपालिकेने घेतल्या गेल्या.
त्यानंतर फलटण तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मनोजकुमार जयसिंग काकडे वय ५३ वर्षे यांना फलटण प्रभारी तहसीलदार रमेश पाटील यांनी पुरवठा निरीक्षक मनोजकुमार काकडे यांच्याशी संपर्क करून फलटण नगरपरिषदेच्या वतिने चाललेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत हॉटेल न्यू आनंद विलास हे हॉटेल कापसे यांच्या हॉटेल वरील मजल्यावर अनाधिकृतपणे गॅस सिलेंडरचा साठा नगरपालिकेचे कर्मचारी यांना सापडला आहे. त्याठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले.
मुस्ताक महात यांनी बाजूला काढून ठेवलेल्या गॅस सिलेंडर साठ्याचा काकडे यांनी स्वत: दोन पंचासमक्ष जागीच पंचनामा करून एकूण ४३ गॅस सिलेंडर जप्त केले. त्यामध्ये ५ किलो क्षमतेचे भारत गॅसचे ४ मोकळे सिलेंडर, १४ किलोचा १ गॅस सिलेंडर भरलेला तसेच ५ किलो क्षमतेचा एच पी चा १ मोकळा गॅस सिलेंडर, १४ किलोचे १५ गॅस सिलेंडर, त्यापैकी गॅस सिलेंडर भरलेले व ८ मोकळे गॅस सिलेंडर व बिगर कंपनीचे १ किलोचे १४ मोकळे गॅस सिलेंडर, ३ किलोचे ७ मोकळे गॅस सिलेंडर असे भारत व एच.पी.व बिगर कंपनीचे मोकळे व भरलेले एकूण ४३ गॅस सिलेंडर मिळाले आहेत. सदरच्या सर्व सिलेंडर ची एकूण किंमत ही ३७,९५० एवढी आहे. सदरचे सर्व सिलेंडर हे पुरवढा निरीक्षक मनोजकुमार काकडे यांनी जप्त केले. सदरच्या घटनेची पाहणी फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी व प्रभारी तहसिलदार रमेश पाटील यांनी केली व त्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये राजाळे मंडल अधिकारी जितेंद्र कोंडके, फलटण तलाठी योगेश घेडे, प्रभारी तहसीलदार रमेश पाटील यांनी सहभाग घेतला होता.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |