सातारा : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पुरोगामी विचार व चळवळीत मौलिक योगदान देणार्या कार्यकर्त्याच्या गौरवार्थ देण्यात येणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी परिवर्तनवादी डाव्या संघटनां समन्वय समितीचे संघटक व महाराष्ट्र पातळीवर जातीय व धार्मिक सलोखा गटाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिनाज सय्यद यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे व उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.
प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ दिवंगत कार्यकर्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे यांचे जन्मदिनी येत्या मंगळवारी 26 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांच्या उपस्थितीत मिनाज सय्यद यांना यावर्षीचा बारावा पुरस्कार नगरवाचनालयाच्या पाठक हाँल मध्ये होणार्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. या प्रसंगी संस्थेच्या 32 वर्षाच्या वाटचालीच्या सचित्र रंगीत स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाह अॅड. हौसेराव धुमाळ यांनी केले आहे.
यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी मिनाज सय्यद हे मेकॅनिकल इंजिनियर असून काँलेज जीवनापासून पुरोगामी चळवळीत कार्यरत आहेत. काँलेजचे शिक्षणानंतर त्यांनी आरोग्य क्षेत्रात अल्प मानधनावर सुमारे बारा वर्षे पुर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.
त्यांनी जाणीवपुर्वक आंतरधर्मीय विवाह केला असून जमातवाद विरोधातील लढ्यात तसेच राष्ट्रीय एकात्मता संवर्धनासाठी ठोस भूमिका घेऊन ते सामाजिक प्रबोधनाचे काम करीत आहेत. मुस्लिम समाजाच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रश्नांवर कामा बरोबरच मुस्लिम जागृती अभियानाद्वारे गेले कांही वर्षांपासून सातारा येथील गांधी मैदानावर पैगंबर जयंतीस सर्वधर्म भाईचारा सभेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात ते महत्त्वाचे योगदान देत आहेत.
त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या सहकार्याने मराठवाड्यात चर्मोद्योगाच्या आधुनिकीकरण प्रकल्पाची उभारणी केली आहे. तसेच या विभागात सल्लागार म्हणून चार वर्षे काम केले आहे. पर्यायी विकास नीती प्रयोगातील रचनात्मक कामात योगदान दिले आहे. प्रसिद्धी परांग्ड़मुख राहून निष्ठेने सार्वजनिक कार्यात ते सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी 'निर्माण' नियतकालिक तसेच 'धूमकेतू' हे मासिक लहान मुलांच्या विज्ञान जागरासाठी सात वर्षे चालविले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |