08:06pm | Feb 21, 2020 |
सातारा : सातारा शहर व परिसरात आज महाशिवरात्र निमीत्त अनेक भाविकांनी श्री शंकराचे दर्शन घेवून मनोकामना केली. गणेश व महादेव मंदीरात जावून पहाटेपासूनच रूद्राभिषेक, होमहवन, पालकी मिरवणूक, आदी धार्मिक विधी मोठ्या ऊ त्साहात पार पडला.
शिखर शिंगणापूर याठिकाणी महाशिवरात्री निमीत्त नादब्रम्ह कला मंडळाच्या वतीने संगित महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला, शंभु महादेवाची महापूजा, शिवलिलामृत ग्रंथ ज्ञानेश्वर गाथा, ओम नम:शिवाय जप पठन करण्यात आले. सायगाव येथील प्राचीन शिवकालीन मंदीरात स्वच्छता राखून भाविकांसाठी हे मंदीर खर्या अर्थाने महादर्शन घेण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. नांदगिरी नजीक कल्याणगड येथील पार्श्वनाथ मंदीरातही डोंगर चढून दर्शन घेतले. तसेच शेबडी ता. जावली येथील क्षेत्र विनायक नगर येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले येथील विशेष म्हणजे गुहेतिल शिवलिंग व महा नंदी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. सातारा येथील नटराज मंदीर,पाटेश्वर, पेटेश्वर, कुरणेश्वर, कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर,चवणेश्वर,श्री क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील शिवमंदीरात पहाटेपासूनच भाविकांची रिघ लागली होती. पाटण तालुक्यातील रूद्रेश्वर बहुलेश्वर, व दुर्गम भागातील वासोटा किल्या नजीकचे नागेश्वर मंदीर या ठिकाणी युवकांनी मोठया उत्साहात श्रींचे दर्शन घेत महाशिवरात्र साजरी केली. खटाव तालुक्यातील अंबेरी येथील शिवधाम मंदीरात आरती व शिवपंचायत प्रार्थना,लघुरूद्राभिषेक करण्यात आला. श्री क्षेत्र माहुली, लिंब व सातारा येथील श्री कोटेश्वर, मेरूलिंग, म्हसवड येथील सिध्दनाथ देवी जोगेश्वरी मंदीरातील भुयारी मधील शिवलिंगाचे काल रात्री 10 वा दर्शन घेतले. हे शिवलंग वर्षभर बंद असते ते आज खूले झाल्याने भाविकांनी त्याचा लाभ घेतला. श्री सिध्दनाथ हे काशी विश्वेश्वरांचे अवतार समजले जातात. हेमाडपंथीय दगडी पुरातन मंदीरात आज भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच शहरातील विविध शिवमंदीराबाहेर खिचडी दुध, रताळी, राजगिरे लाडू, फळे यांचे प्रसाद म्हणून अनेक दानशुर व्यक्तिंनी महाप्रसादाचे आयोजन केल्यामुळे या महाशिवरात्रीनिमीत्त महाप्रसाद हा खर्या अर्थाने भाविकांसाठी लाभदायक ठरला. विशेषत:महिला, युवती वर्ग व जेष्ठ नागरिकांचा महाशिवरात्रीनिमीत्त सर्वच शिवमंदीरात ऊ त्साह दिसून आला.
अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे भाविकांना मंदिरापर्यत जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. भाविकांना श्रींच्या दर्शनाची ओढ लागल्याने कोणीही त्याबाबत तक्रार केली नसल्याने महाशिवरात्रीला यात्रेचे स्वरूप आले होते. काही मंदीरे ही सहाशे वर्षापूर्वीची असल्याने आजही धार्मीक परंपरा जपली जाते. यावेळी स्वयंसेवक,पोलीसदलाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |