03:57pm | Mar 22, 2019 |
सातारा : सातार्यातील एमआयडीसी ओस पडली, युनियनच्या समस्या वाढल्या, पोलिसांची व जिल्हा प्रशासनाची याकामी मदत झाली नाही, केंद्राने लोकहिताच्या विरोधात निर्णय घेतला, कॉलेजच्या गेटबाहेर रियली लाईफ समजेल, त्यामुळे कोणाला, का व कशासाठी मतदान करावे? याचे आरशासमोर उभे राहून मूल्यमापन करा, असा बहुमोल सल्ला खा. उदयनराजे भोसले यांनी कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा याठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर खा. भोसले व त्यांच्या समर्थकांनी नव मतदारापासून अनेक पक्षाच्या लोकांच्या गाठीभेटी घेण्यात धन्यता मानली आहे. आज सदरबझार येथील महाविद्यालयात अलिशान मंडपात झालेल्या संवादावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राम हादगे, प्रिया साबळे, संजय जाधव, वैभव पोतदार व मान्यवर उपस्थित होते.
सिनेअभिनेते समृद्धी जाधव यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवित फिल्मी डायलॉगबाजी करीत खासदारांचा गुणगौरव केला. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न मांडण्याची सूचना केली. सातारा शहरातील वैशाली आंबेकर या विद्यार्थीनीने आम्हाला शिक्षण घ्यायचे झाले तर सातारा सोडून अन्य ठिकाणी जावे लागते, असा प्रश्न केला, तर साहिल मुल्ला या विद्यार्थ्याने सातार्यात शिक्षण घेवूनसुद्धा एमआयडीसी ओस पडल्यामुळे नोकर्या उपलब्ध नाहीत, असा धाडसाने प्रश्न मांडला. या दोन्ही प्रश्नांना उत्तर देताना खा. भोसले म्हणाले, तुमच्या दोन्ही प्रश्नांशी मी सहमत आहे. सातारा जिल्ह्यात छ. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, तसेच कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वैद्यकीय महाविद्यालही सुरु होणार आहे. हे रयत शिक्षण संस्थेचे कॉलेज आहे. या कॉलेजच्या स्थापनेसाठी आमच्या छत्रपती घराण्याने खूप मोठे सहकार्य केले आहे. सध्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे तीन शिफ्टमध्ये चालणारे कारखाने बंद झालेले आहेत. डी झोन असताना औंद्योगिक वसाहतीमध्ये चाळीस टक्के सबसिडी मिळत होती. काहींनी प्रपोजल टाकून सबसिडी घेतली आणि पसार झाले. त्यामुळे बंद अवस्थेतील एमआयडीसी पहावयास मिळत आहे. मला सर्वच राजकीय पक्षांची ऑफर होती. पण मी इश्युबेस काम करतो. त्यामुळे मला पदाची अपेक्षा नाही. जय आणि पराजय होतच राहतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने खासदार समर्थक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खा. भोसले यांना बुलेटवरुन फेरफटका मारण्यास भाग पाडले. यावेळी त्यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे होते. पण हा संवाद मेळावा गुंडाळण्यात आला.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |