सातारा : प्रतापपूर, ता. जत, जि. सांगली येथे लपून बसलेल्या मोक्का गुन्ह्यात हव्या असलेल्या दत्ता जाधव याला पकडण्यासाठी गेलेल्या सातारा व सांगली पोलीस पथकावर तुफान दगडफेक करुन जिवे मारण्याचा गुन्हा दाखल असलेल्या दोघांना आज सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने प्रतापसिंह नगरमधून अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा येथील नामचीन गुन्हेगार दत्तात्रय रामचंद्र जाधव उर्फ दत्ता याच्यावर सातारा शहर तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अवैध सावकारी प्रकरणात दत्ता जाधवचे नाव आल्यानंतर त्याच्यावर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली होती. तेव्हापासून दत्ता जाधव हा सातार्यातून फरार होता. त्याच्या तपासासाठी पोलीस पथके महाराष्ट्रभरात शोध घेत होती. असे असताना दि. 25 एप्रिल रोजी दत्ता जाधव हा आपल्या सहकार्यांसमवेत प्रतापपूर, ता. जत, जि. सांगली येथे असल्याची खात्रीशीर माहिती खबर्यांमार्फत सातारा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सातारा पोलीसांनी परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचार्यांचे पोलीस पथक तयार केले होते.
25 एप्रिल रोजी या पथकाने सांगली पोलिसांच्या मदतीने प्रतापपूर येथे छापा मारला. त्यावेळी दत्ता जाधव व त्याच्या सोबत असलेल्या शेकडो स्त्री व पुरुषांनी पोलीस पथकावर तुफान दगडफेक करुन पोलिसांना जखमी केले होते. त्या रात्री प्रतापपूर येथे गावची यात्रा होती, तसेच तमाशाचा कार्यक्रमही सुरु होता. याचा फायदा घेवून दत्ता जाधवने त्या ठिकाणावरुन पोबारा केला होता. दत्ता जाधवचा लहान भाऊ युवराज जाधव व त्याच्या सहकार्यांनी दत्ता जाधव याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी अटक करण्यास गेलेल्या पोलीस पार्टीवरच दगड, मिरची पावडर, घातक शस्त्रांनी हल्ला चढवला. यात अनेक महिला व पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. शेवटी पोलीस दलाने बळाचा वापर करीत युवराज जाधव व त्याच्या सहकार्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या प्रकरणातील दत्ता जाधवसह अनेक गुन्हेगार अद्यापपर्यंत फरार आहेत. यातील दोन आरोपी प्रतापसिंह नगर येथे आल्याची पक्की खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार आज पोलिसांनी प्रतापसिंह नगर येथे सापळा रचून दीपक अण्णा लोंढे व धनराज उर्फ धनू ज्ञानदेव बडेकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर जत पोलीस ठाण्यामध्ये मारामारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना जत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता जाधव अजून फरार आहे. तो प्रतापसिंह नगरातच असल्याची अटकळ पोलिसांनी बांधली आहे. मात्र, दत्ता जाधव एवढे दिवस पोलिसांना मिळून येत नसल्यामुळे सातारा पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दत्ताचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्रतापसिंह नगरातून होवू लागली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |