कराड : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचे निवडणूक प्रचार कार्यालय आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉल येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, आर. टी. स्वामी, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, शिवाजीराव जाधव, जि.प. सदस्या सौ. शामबाला घोडके, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मदनराव मोहिते म्हणाले, गावागावांतील कार्यकर्त्यांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेऊन विजयी करण्यासाठी कामाला लागावे. डॉ. सुरेश भोसले यांनी बुथ अध्यक्ष व बुथ कमिटी सदस्यांच्या कार्याचे कौतुक करुन, मोठा विजय संपादन करण्याच्या दृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन केले.
यावेळी आर. टी. स्वामी, सुनील पाटील, कविता कचरे, अशोकराव थोरात यांनीही मनोगते व्यक्त केली. संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मलकापूरचे नगरसेवक आबा सोळवंडे, रेठरे बुद्रुकच्या सरपंच सुवर्णा कापूरकर, डॉ. सारिका गावडे, दाजी जमाले, जयश्री कारंडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |