सातारा : शेंद्रे ता. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरने तिसरा वर्धापन दिन १० जून २०१८ रोजी साजरा केला आणि या औचित्याने पुणे ते बेळगाव दरम्यान पहिल्या आणि एकमेव पेट -सीटी स्कॅन मशीनचे अनावरण करण्यात आले. या अद्ययावत न्यून्क्लिअर इमेजिंग तंत्रामध्ये पोझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) आणि सीटी स्कॅन यांची एका यंत्रात सांगड घालण्यात आली आहे. या यंत्राच्या माध्यमातून एकाच इमेजिंग सत्रात पेशींची व उतींची रचना व कार्य याबाबत माहिती मिळते.
ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री उदय शिवाजीराव देशमुख यांनी या मशीनचे अनावरण केले. या वेळी छत्रपती शिवाजीराजे भोसले, उद्योगपती श्री. फारुख कूपर, श्री.नितीन माने, श्री.धीरेंद्र राजपुरोहित, श्री.श्रीकांत पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, डॉ. विकास पाटील, डॉ. प्रताप राजेमहाडिक, डॉ. मनोज लोखंडे, डॉ. आलोक पावसकर, डॉ. करण चंचलानी आणि ऑन्को लाईफ सेंटरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर हे साताऱ्यातील शेंद्रे येथे आहे. त्याची स्थापना श्री. उदय शिवाजीराव देशमुख यांनी केली. हे ५२ बेडची सोय असलेले आणि प्रशिक्षित कर्मचारी असलेले हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट व ऑन्को पॅथॉलॉजिस्ट आहेत.
या ठिकाणी अद्ययावत ऑपरेशन थिएटर असून त्याला सर्जिकल आयसीयू , ऑन्को पॅथॉलॉजि , केमोथेरपी विभाग, रेडिएशन थेरपी विभाग, कॅन्सर पुनर्वसन केंद्र, डे केअर ट्रीटमेंट आणि ऑन्को फार्मसी या सेवाही जोडलेल्या आहेत. या केंद्रात आतापर्यंत ५२९३ रुग्णांची नोंद झालेली आहे, १२०८ रुग्णांनी रेडिएशन तर सुमारे १४७५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि ३५४६ केमोथेरपी देण्यात आल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले आणि एकमेव नवे पेट-सीटी स्कॅन मशीन आहे. कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे उपचारपद्धती ठरविण्याबाबत निर्णय घेण्यासाठीही या यंत्राचा उपयोग होतो. उपचारांवर लक्ष ठेवण्यासाठी पेट-सीटी चाचण्यांचा वापर केला तर सीटी स्कॅन किंवा एमआरआय या पारंपरिक तंत्रांच्या तुलनेत रोगाच्या व्यवस्थापन पद्धतीत ३५-५०% बदल करावा लागतो. पेट-सीटी स्कॅन केल्यावर ९०% हून अधिक रुग्णांमध्ये निदान करण्यासाठी पुढील तपासण्यांची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे रुग्णावर उपचारांचा कितपत परिणाम होत आहे, याचीही खातर जमा या मशीनच्या माध्यमातून करू शकतो.
कर्करोगाच्या पेशींच्या चयापचयाचा दर हा कर्करोगयुक्त नसलेल्या पेशींच्या तुलनेत अधिक असतो. या उच्च पातळीच्या रासायनिक कृतीमुळे पेट स्कॅनमध्ये कर्करोगाच्या पेशी उजळ ठिपक्यांच्या रूपात दिसतात. त्याचप्रमाणे पेट स्कॅनमुळे कर्करोगाचे निदान होण्यासोबतच तो किती फोफावला आहे, हे दिसून येते. या माध्यमातून, कर्करोगावरील उपचारांचा उपयोग आहे की नाही, याचा अंदाज येतो आणि कर्करोग परतण्याबाबतही खातरजमा करता येते.
"या चाचण्यांचे लाभ हे जोखमींच्या तुलनेत खूपच असतात. या तपासण्या केल्यास एखाद्या उपचारपद्धतींना उगाचच नकार देण्याला प्रतिबंध होतो. त्यामुळे रुग्णांना अपरिणामकारक आणि टॉक्सिक उपचारपद्धतीना टाळून सुयोग्य उपचारपद्धतींचे लाभ घेता येतात. आम्ही जिनेटीक लॅब , नर्सिंग कॉलेज, डीएनबी फेलोशिप आणि वेदनाशामक उपचार (Palliative Care) सेवा सुरू करण्यात येणार आहेत." अशी पुष्टी श्री. देशमुख यांनी जोडली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |