कराड : सध्या जगभरात करोना विषाणू (कोवीड-19) व्हायरसचा प्रभाव जाणवत आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात देखील जाणवत आहे. जिल्हाधिकारी सातारा यांच्या दि.15 मार्च च्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमातील निर्देशानूसार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे दि. 11 मार्च च्या परिपत्रकान्वये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाच्या व शासनाच्या आदेशानूसार खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व खाजगी, शासकीय तसेच गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना आहेत, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपले कार्यक्षेत्रातील चित्रपटगृहे, जलतरणपुल, व्यायामशाळा, अंगणवाडी, प्राथमिक व खाजगी शाळा, महाविद्यालये या सारखे सर्व ठिकाणे दि. 31 मार्च 2020 अखेर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरी संबंधीतांनी याची नोंद घ्यावी व नागरीकांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाणेचे टाळावे.
जिल्हाधिकारी सातारा यांचे सूचनेनूसार मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, स्वच्छतादूत, कर्मचारी-अधिकारी, बचतगट, अंगणवाडी सेविका-मदतनीस, प्राथमिक व खाजगी शाळांचे शिक्षक-मुख्याध्यापक, शहरातील सर्व हॉस्पिटल यांचे मुख्य डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व तात्पुरत्या कालावधीकरीता आशांची नेमणूक करुन यांच्यामार्फत प्रभागनिहाय प्रत्येक घरामध्ये जावून कोरोना (कोवीड-19) या विषाणूबाबतची जनजागृती व हा आजार होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी याकरीता दि. 18 मार्च 2020 पासून सर्व्हे करण्यात येणार आहे. सर्व्हेनुसार संबंधीत नागरीकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने मार्गदर्शन, तपासणी व औषध उपचार करण्यात येणार आहेत. याबाबतचे नियोजन करण्याची मिटींग मलकापूर नगरपरिषद बहुउद्देशीय इमारत, लक्ष्मीनगर, मलकापूर या ठिकाणी मंगळवार दि. 17 मार्च 2020 रोजी सकाळी ठिक. 9.30 वाजता आयोजित केली आहे.
तरी नागरीकांनी करोना विषाणू (कोवीड-19) हा आजार होवू नये म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. जसे की, श्वसनसंस्थेचा विकार असणार्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे, हात साबनाने व स्वच्छ पाण्याने वारंवार धुणे, शिंकताना व खोकताना नाका तोंडावर रुमाल अथवा टिशुपेपर धरणे, अर्धवट शिजलेले व कच्चे मांस खावू नये, श्वसनास त्रास होणार्या व्यक्ती तसेच इतर करोना संक्रमीत देशातून, राज्यातून व शहरातून प्रवास केलेल्या व्यक्ती यांनी ताबोडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मलकापूर शहरामधून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जात असलेने व शहरामध्ये मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, औद्योगिक वसाहत यामुळे बाहेरील लोकांचा शहरातील नागरीकांशी संपर्क होत आहे. त्यामुळे नागरीकांनी या ठिकाणी दक्षता घेणे आवश्यक आहे. याकरीता शहरातील स्वच्छतादूत, युवक व नागरीकांनी आपल्या परिसरात करोना बाधीत शहरातून आलेल्या व्यक्तींची माहिती मलकापूर नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील दूरध्वनी क्र. 02164-241535, 241325 यावर तसेच सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टोल फ्रि क्र. 104, राष्ट्रीय कॉलसेंटर क्र. 91-11-23978046 यांच्याकडे देण्यात यावी. मलकापूर नगरपरिषदमार्फत करोना व्हायरस या आजारापासून बचाव होण्यासाठी मदत कक्ष स्थापन केला आहे. तरी कोणत्याही मदतीकरीता वरील क्रमांकाशी संपर्क साधावा. तसेच व्हॉट्सअॅ़प व इतर सोशल मिडियावरील अफवांना नागरीकांनी बळी पडू नये याची पुर्णपणे खातरजमा केल्या शिवाय इतर नागरीकांना अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करु नयेत. या आजारास नागरीकांनी घाबरुन न जाता हा आजारा होवू नये म्हणून काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी यांनी केले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |